PAK च्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला सरकारवर रोष, म्हणाले – ‘शेम ऑन यू पाकिस्तान गव्हर्नमेंट, भारताकडून काहीतरी शिका’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या वुहान येथील कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. त्यामुळे सगळे देश या व्हायरसचा संसर्ग होण्यापासून कसे वाचता येईल याची काळजी घेत आहेत. एकंदरीतच चीनमधील इतर देशातील दूतावास आपल्या नागरिकांना आपल्या देशात घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून आपल्या लोकांना या व्हायरसचा संसर्ग होणार नाही. चीनमधील कोरोना व्हायरसचे केंद्र असलेल्या वुहानमध्ये काही पाकिस्तानी विद्यार्थी अडकले असून पाकिस्तानातील इम्रान खान सरकारने या विद्यार्थ्यांना देशात न आणण्याचा निर्णय घेतला असून त्यांना तेथेच मरण्यासाठी सोडले आहे.

दरम्यान पाकिस्तान सरकारने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांना दुःख झाले आहे आणि याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे याचा प्रत्यय त्यातून येतो. या व्हिडिओमध्ये भारतीय विद्यार्थी घरी जाण्यासाठी बसमध्ये बसत आहेत आणि याचे चित्रण पाकिस्तानी विद्यार्थ्यांने आपल्या मोबाइलमध्ये केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्या सरकारवर निराश असल्याचे चित्र समोर आले आहे.

हा व्हिडीओ पाकिस्तानातील पत्रकार नायला इनायतने शेअर केला आहे. यामध्ये एका विद्यार्थ्यांने आपले मत व्यक्त केले की, जे विद्यार्थी बसमध्ये बसत आहेत ते भारतीय असून त्यांना घेऊन जाण्यासाठी भारतीय दूतावासाने बस पाठवली आहे. वुहान विद्यापीठातून ही बस एयरपोर्टला जाईल आणि या विद्यार्थ्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्यात येईल. तसेच बांगलादेश सरकारकडून देखील विद्यार्थ्यांना नेण्यासाठी बस पाठविण्यात येणार आहे. असे त्या विद्यार्थ्याने सांगितले असून पाकिस्तानातील इम्रान खान सरकारवर त्याने नाराजी वर्तविली आहे.

तसेच पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्ही पाकिस्तानी विद्यार्थी असून इथे अडकलो आहोत. इतर देशातील सरकार विद्यार्थ्यांना स्वदेशी घेऊन जात आहे मात्र आमचे पाकिस्तान सरकार म्हणते, आपण जिवंत रहा किंवा मरा, जर संक्रमण होत असेल तर होऊद्या, आम्ही तुम्हाला कसलीही सुविधा देणार नाही आणि स्वदेशीही घेऊन जाणार नाही. यावर पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला असून ते आपल्या सरकारविरोधात म्हणाले की तुम्हाला लाज वाटायला हवी पाक सरकार. तुम्हाला भारताकडून काहीतरी शिकायला हवं. ते कशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या घरी घेऊन जात आहेत.