CPM नेते सीताराम येचुरींच्या मुलाच्या निधनावर BJP नेत्याचे आक्षेपार्ह ट्विट, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचा मुलगा आशिष येचुरी (वय 35) याचे गुरुवारी (दि. 22) सकाळी कोरोनाने निधन झाले. त्याच्या निधनानंतर सर्वजण शोक व्यक्त करत आहेत. मात्र भाजप मृत्यूवरही राजकारण करत आहे. बिहार भाजपचे उपाध्यक्ष मिथिलेश कुमार तिवारी यांनी आशिषच्या निधनानंतर आक्षेपार्ह ट्विट केले आहे. चीनच समर्थन करणाऱ्या सीपीएम सरचिटणीस सीताराम येचुरी यांचा मुलगा आशिष येचुरी याचे चायनीज कोरोनामुळे निधन झाल्याचे तिवारीनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यामुळे राजकारण किती खालच्या पातळीला गेले आहे अन् राजकीय नेते किती द्वेष करतात हे भाजप नेत्याच्या ट्विटवरून दिसत आहे. दरम्यान ट्विटरवर होत असलेल्या टीकेनंतर तिवारीनी आपले ट्विट तातडीने डिलिट केले आहे.

मिथिलेश कुमार तिवारी यांनी केलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली आहे. ट्विटरवर एका युजरने म्हटले लाज वाटली पाहिजे असे म्हणत, हे लिहिण्यासाठी कुठली लस घेतली आहे. कोरोनाच्या संकटात एकिकडे नागरिक एकमेकांना आधार देत आहेत आणि शक्य ती मदत करत आहेत. मात्र असे असतानाही भाजपचे नेते राजकारण करण्याची संधी सोडताना दिसत नाहीत. तिवारीनी आपले ट्विट डिलिट केले असले तरी त्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत असून टीका होत आहे. दरम्यान आशिष येचुरी याच्या निधनानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे.