Shameless Trailer : सयानी गुप्ताच्या ‘शेमलेस’ची ‘ऑस्कर’मध्ये एन्ट्री ! सोशल मीडियावर क्रेझी झाले स्टार्स

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सयानी गुप्ता (Sayani Gupta) आणि हुसैन दलाल (Hussain Dalal) स्टारर शेमलेस (Shameless) हा सिनेमा सतत चर्चेत असल्याचं दिसत आहे. या वर्षी आयोजित होणाऱ्या 93 व्या ऑस्कर अवॉर्डमध्ये या सिनेमानं भारताकडून अधिकृत एन्ट्री घेतली आहे. दीर्घकाळ प्रतिक्षेनंतर आता सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. सध्या ट्रेलरनं सोशवर चांगलाच बज क्रिएट केला आहे.

ट्रेलरमध्ये हुसैन दलाल याला एक असा व्यक्ती दाखवलं आहे जो सतत फूड डिलीव्हरी सर्व्हीस वाल्यांकडून जेवण ऑर्डर करत असतो. एवढं करूनही त्याला कशात आनंद मिळत नाही. ट्रेलर सिनेमातील स्टोरीच्या प्लॉटबद्दल जास्त काही सांगताना दिसत नाही. तरीही सिनेमानं आता ऑस्करमध्ये एन्ट्री घेतल्यानं बॉलिवूड स्टार्सच्या आनंदाला पारावार उरला नाही असं दिसतंय. सध्या सिनेमाचा ट्रेलर सोशलवर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी हा ट्रेलर शेअरही केला आहे.

सोशल मीडियावर स्टार्स क्रेझी
अनन्या पांडे , राजकुमार राव, सिद्धांत चतुर्वेदी, हृतिक रोशन आणि आयुष्यमान खुराना अशा स्टार्सवर सिनेमाचा क्रेझीनेस स्पष्ट दिसत आहे. या सर्व कलाकारांनी इंस्टांच्या स्टोरीलाईनला सिनेमा आणि ट्रेलरबद्दल काही ना काही लिहिलं आहे. अनन्या पांडेनं पोस्टर आणि ट्रेलर शेअर केला आहे. सर्वांना गुडलक असं म्हणत हृतिकनंही पोस्ट शेअर केली आहे आणि शुभेच्छा दिल्या आहेत.