Shamita Shetty H’Bday | शमिता शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या खाजगी आयुष्यातील काही रंजक गोष्टी

0
180
Shamita Shetty H'Bday | shamita shetty birthday know actress net worth car collection movies
file photo

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty H’Bday) बिग बॉस 15 मुळे जास्त चर्चेत आली होती. शमिता शेट्टी आज तिचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. शमिताने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शमिताचे वैयक्तिक आयुष्य देखील खूपच चर्चेत होते. फॅशन डिझाईन मध्ये शमिताने डिप्लोमा पूर्ण केले. त्यानंतर तिने प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा सोबत काम केले. त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आज शमिताच्या (Shamita Shetty H’Bday) वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील रंजक गोष्टी जाणून घेऊयात.

शमिताने 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहब्बते’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले. त्यामध्ये फरेब, जहर, कॅश या चित्रपटांचा समावेश आहे. एवढेच नाही तर शमिता अनेक रियालिटी शोमध्ये देखील दिसून आली होती. झलक दिखला जा, फियर फॅक्टर खतरों के खिलाडी त्याचबरोबर बिग बॉसच्या तिसऱ्या आणि पंधराव्या सीझनमध्ये ती झळकली होती. याशिवाय शमिताने ‘यो के हुआ ब्रो’ या सिरीजमधील तिच्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले होते. तसेच तिने ब्लॅक विडोज नावाच्या थ्रिलर चित्रपटामध्ये देखील काम केले होते. शमिता तिचे विविध लुक सोशल मीडियावर शेअर करत असते. इंस्टाग्राम वर शमिताचे 4 मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

शमिता कोट्यावधींची मालकीण आहे. तिच्याकडे अनेक गाड्या आहेत. त्यातीलच मर्सिडीज बेंज ही कार तिच्याजवळ आहे. ज्याची किंमत जवळपास 2 कोटी आहे. तसेच तिच्याकडे बीएमडब्ल्यू एक्स 6 (BMW X6) ही गाडी देखील आहे. त्याची किंमत जवळपास 96 कोटी रुपये आहे. शमिताच्या (Shamita Shetty H’Bday) खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास तिची आणि राकेश बापटची ओळख बिग बॉस ओटीटी मध्ये झाली होती. त्यानंतर बिग बॉस मधून बाहेर पडताच दोघेही अनेक पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये दिसले होते. तर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनी ब्रेकअप झाल्याची माहिती दिली आहे.

Web Title :- Shamita Shetty H’Bday | shamita shetty birthday know actress net worth car collection movies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra MLC Election Results | ‘सत्यजीत तांबे जिंकले तरीही तो भाजपचा विजय नसेल…;’ – जयंत पाटील

Pune Crime News | ‘आरोपी पकडा अन् बक्षीस मिळवा’, कोयता गँगच्या दहशतीमुळे पुणे पोलिसांची अनोखी योजना

Maharashtra MLC Election Results | सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार नाहीत…; मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले कारण