Shamita Shetty Worth | अभिनेत्री शमिता शेट्टीकडे कोट्यवधींची संपत्ती; पण सिनेविश्वात फ्लॉप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shamita Shetty Worth | भारतीय अभिनेत्री असलेली शमिता शेट्टीकडे (Shamita Shetty) कोट्यवधींची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. बिग बॉस ओटीटी (Big Boss OTT) आणि त्यानंतर बिग बॉस 15 (Bigg Boss 15) या कार्यक्रमामुळे शमिता फेमस झाली आहे. आज (बुधवारी) तिचा जन्मदिन (Birthday) आहे. शमिताने बिग बॉसचं विजेतेपद मिळवलं नसलं तरी देखील अनेक प्रेक्षक तिचे चाहते झाले आहेत. (Shamita Shetty Worth)

 

शमिताचा जन्म 2 फेब्रुवारी 1979 रोजी कर्नाटकमधील (Karnataka) मैंगलोर याठिकाणी झाला. शमिताचे आई-वडील उद्योगपती होते. ते फार्मास्युटिकल उद्योगात सक्रीय होते. शिक्षण झाल्यानंतर ती फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत (Manish Malhotra) काम करू लागली. मनीषने तिला अभिनय क्षेत्रात यश मिळवण्याचा सल्ला दिला. तसेच, शमिताने आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) ‘मोहब्बते’ सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या सिनेमात शमिता सह अनेक दिग्गज कलाकार होते. शमिताच्या अभिनयाची दखल घेत तिला डेब्यू ऑफ द इअर हा पुरस्कार देखील दिला होता. (Shamita Shetty Worth)

दरम्यान, शमिताने फरेब, जहर, कॅश यांसारख्या सिनेमात काम केले आहे. मात्र, शिल्पाला बॉलिवूडमध्ये जे यश मिळाले ते यश शमिताला मिळालं नाही. मग ती बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वामध्ये सहभागी झाली. शमिता झलक दिखला जा, खतरों के खिलाडीमध्येही सहभागी झाली होती. तिने सिनेमांशिवाय ‘ब्रो और ब्लॅक विडोज’ या वेबसीरिजमध्ये काम केले. भलेही शमिता सिनेविश्वात तिचा ठसा उमटवू शकली नाही. पण, तिच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. शमिताची संपत्ती सुमारे एक ते पाच मिलियन डॉलर इतकी आहे. अशी माहिती एका रिपोर्ट्सनुसार समोर आलीय. दरम्यान शमिता इंटेरिअर डिझायनर आहे आणि ती अनेक ब्रँडच्या जाहिराती देखील करते.

 

Web Title :-  Shamita Shetty Worth | shamita shettys net worth is in crores but she fail in bollywood

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | चरस अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1696 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corona Update | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 5521 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी