Coronavirus : रुग्णालयात दाखल असलेल्या ‘कोरोना’ संशयिताने केली आत्महत्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शामली येथील निर्माणाधीन जिल्हा रुग्णालयात बांधल्या गेलेल्या क्वारंटाइन वॉर्डमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या कोरोना संशयित रूग्णाने गळफास लावून आत्महत्या केली. या रुग्णाला वॉर्डच्या एका स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री उशिरा रुग्णाने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. गुरुवारी सकाळी याची माहिती मिळताच खळबळ उडाली. कंधला भागातील या संशयित रुग्णाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविले आहेत. अहवाल येणे अजून बाकी आहे. संशयित रुग्णाच्या आत्महत्येची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी व एसपी यांनी घटनास्थळावर जाऊन माहिती गोळा केली.

या रुग्णाचा अजून रिपोर्ट आला नव्हता

मिळालेल्या माहितीनुसार, कंधला भागातील एका खेड्यातील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय व्यक्तीला 31 मार्च रोजी कोरोनाची लक्षणे दिसल्याप्रकरणी वॉर्डात आणले गेले आणि त्याच दिवशी नमुने तपासणीसाठी पाठविले. अद्याप त्याचा अहवाल आला नाही. परंतु गुरुवारी सकाळी या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. जिल्हाधिकारी जसजित कौर, एसपी विनीत जयस्वाल, सीएमओ डॉ संजय भटनागर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आत्महत्या केलेल्या ठिकाणी सेफ्टी किट्ससह डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. जिल्हा दंडाधिकारी जसजित कौर सांगतात की त्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लक्षणे होती आणि तपासणीसाठी एक नमुना देखील पाठविला गेलेला आहे. परंतु अद्याप अहवाल आलेला नाही. त्याचवेळी, या युवकाचा परदेशी हिस्‍ट्री आहे की नाही हे देखील अद्याप समजू शकले नाही.

दुसरीकडे आरोग्य विभागाने बुधवारी एकूण 25 नमुने पाठवले आहेत. यात पूर्वी संसर्ग झालेल्या तरुणाचा नमुनादेखील आहे. विभागाने १२ बांगलादेशी आणि इतरांचे नमुनेही घेतले आहेत, परंतु हे गुरुवारी तपासणीसाठी पाठविले जातील. विभागाने सांगितले की यांमध्ये कोणतेही लक्षणं नाहीत, परंतु खबरदारी म्हणून नमुने घेण्यात येत आहेत.

पोलिस प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 182 लोकांना चिन्हित केले आहे. उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील आणि देशातील विविध राज्यांबरोबरच यामध्ये बांगलादेशींचा देखील समावेश आहे. तसेच मशिदींमध्ये थांबलेल्या 19 जणांचे नमुने पाठविण्यात आले असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय भटनागर यांनी दिली. पोलिस स्टेशन मधील बांगलादेशीयांचे देखील सॅम्पल विभागीय टीमने संग्रहित केले आहेत. आज ते तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत आणि आणखी काही नमुने देखील घेतले जात आहेत.