Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

पोलीसनामा ऑनलाइन : Shamna Kasim | सध्या चित्रपटसृष्टीमध्ये लग्नसराईचा मोसम दिसत आहे आणि त्यामध्येच 2022 या वर्षात अनेक अभिनेत्रींनी गुड न्यूज देखील दिले आहेत. नुकतेच आलिया भट्टने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलियाने लग्नाच्या काही महिन्यातच गोड बातमी चाहत्यांसाठी शेअर केली होती. दाक्षिणात्य अभिनेत्रीने देखील नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. हे ऐकून चाहते देखील प्रचंड आनंदित झाले आहेत. (Shamna Kasim)

चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शमना कासिम (Shamna Kasim) हिने गुड न्यूज दिली आहे. शमनाने ऑक्टोबर 2022 मध्ये उद्योगपती शनिद आसिफ अलीसोबत विवाह केला होता. आता तिने इंस्टाग्राम वर ही बातमी शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने बेबी बम्प दाखवताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

शमनाने ही बातमी शेअर करताच चाहते तिला शुभेच्छा देत आहेत आणि कलाकारही तिला शुभेच्छा देताना
दिसत आहेत. 24 ऑक्टोबर 2022 मध्ये तिने उद्योगपती शनिद सोबत दुबईमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न
केले होते. लग्नाच्या तीन महिन्यातच तिने गुड न्यूज दिल्याने चाहते देखील आनंदीत आहेत.
शमनाने आजवर अनेक तामिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटात काम केले आहे.
तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःची जागा निर्माण केली आहे.
सध्या शमनाने दिलेल्या या बातमीवर चाहते आनंदी झाले आहेत.

Web Title :-  Shamna Kasim | malyalam actress shamna kasim announces her pregnancy after 3 months of marriage

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan | शेतकऱ्यांच्या खात्यात याच आठवड्यात येऊ शकतो १३ वा हप्ता, असे तपासू शकता स्टेटस

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल