Video : टीकेची पर्वा न करता आणखी एका स्टारकिडला लाँच करतोय करण जोहर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूनंतर घराणेशाहीचा मुद्दा जोरावर होता. आज देखील नेपोटीझम म्हणजेच घराणेशाही वरून बोललं जात आहे. फिल्ममेकर करण जोहर (Karan Johar) या वादात केंद्रस्थानी होता. अनेक स्टारकिड आणि स्टार कुटुंबीयांसह त्याच्यावरही खूप टीका झाली. कारण त्यानं अनेक स्टारकिडला लाँच केलं आहे. आता प्रेक्षकांच्या टीकेची पर्वा न करता करण जोहर आणखी स्टारकिडला लाँच करणार आहे.

बॉलिवूड स्टार अनिल कपूरचा लहान भाऊ अ‍ॅक्टर संजय कपूर (Sanjay Kapoor) आणि महीप कपूर (Maheep Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) हिच्या बॉलिवूड डेब्यूच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. लवकरच ती आपला डेब्यू करणार आहे.

करणनं सोशल मीडियावर ही याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. शनाया लवकरच धर्मा प्रॉडक्शनच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. तिचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. शनायानं देखील काही फोटो शेअर डेब्यूची घोषणा केली आहे.

हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की, ती नेमकी कोणत्या सिनेमातून डेब्यू करते. येत्या जुलै महिन्यात सिनेमाची घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. करणनं ही घोषणा केल्यापासून त्याच्यावर पुन्हा एकदा जोरदा टीक होताना दिसत आहे.