‘या’ महादेवाच्या मंदिरात पलायन केलेल्या प्रेमीयुगूलांना मिळतो आश्रय, पोलिसही घेतात बघ्याची भूमिका

उत्तराखंड : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेश जगभरात नैसर्गिक सौंदर्यासाठी, संस्कृती आणि अनोख्या परंपरा जपणारे राज्य म्हणून प्रसिद्ध आहे. याच हिमाचल प्रदेशात असे एक अनोखे मंदिर आहे जे प्रेम प्रेमी युगुलांच्या रक्षणासाठी ओळखले जाते. ज्या प्रेमींना समाजातील वाईट गोष्टींविरूद्ध जायचे आहे, इथले देवता त्यांचे रक्षण करतात असे मानले जाते. हे मंदिर हिमाचलच्या कुल्लूच्या शांघड गावात आहे. शांगचुल महादेवाचे हे मंदिर महाभारताच्या काळातील प्राचीन मंदिर आहे. येथे शरण येणाऱ्या प्रेमी युगुलांना कोणीही इजा पोहोचवू शकत नाही, मग ते पोलिस असो की त्यांच्या कुटुंबातील सदस्य. त्यामागे एक अतिशय रंजक कथा आहे.

असे मानले जाते की अज्ञातवासाच्या काळात पांडव इथे आले होते. त्यावेळी कौरव त्यांच्या मागे तिथे आले होते. पण त्यावेळी शंगचूल महादेवाने कौरवांना अडवले होते. माझ्या आश्रयाला पांडव आले आहेत तुम्ही येथून निघून जा असे शंगचूल महादेवाने बजावल्यावर कौरव तेथून परतले होते. तेव्हापासूनच प्रेमी युगुलांचं इथे रक्षण केलं जातं. त्यांना आश्रय दिला जातो. असे म्हणतात की, महादेव या जोडप्यांची रक्षा करतात. त्यांच्या समस्या सुटल्यावर ते कुठेही जाऊन राहू शकतात. पण काही अडचण असेल तर ती दूर होईपर्यंत तिथेच त्यांना राहता येतं. प्रेमी युगले येथे आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील वाद जोपर्यंत संपत नाहीत व त्यांच्या विवाहला मान्यता मिळत नाही तोपर्यंत मंदिराचे पुजारी त्यांची काळजी घेतात असे म्हणतात.

या भागात पोलिसांना येण्यास प्रतिबंध आहे. तसेच या गावात दारू, सिगारेट आणि चामड्याच्या वस्तूंवरही बंदी आहे. शस्त्रास्त्र घेऊन गावात प्रवेश करण्यासही मनाई आहे. गावात भांडणे होत नाहीत, तसेच गावात मोठ्याने बोलण्यास मनाई आहे. या लोकांची देवावर मोठी श्रद्धा आहे. दरवर्षी येथे भावीकांची संख्या मोठी असते. यापैकी बरेचसे भाविक प्रेमी जोडपे असतात. 2015 मध्ये मध्यरात्री येथे मंदिरे आणि घरांना आग लागली होती. त्यानंतर मंदिर पुन्हा बांधले गेले.

कसे पोहोचायचे –

सैंज खोऱ्यात शांघड गावापासून 60 किलोमीटर अंतरावर शंगचूल महादेव मंदिर आहे. शानगडपासून सर्वात जवळचे विमानतळ 45 45 कि.मी. अंतरावर भंतूर येथे आहे. येथून शानगडला जाण्यासाठी बस किंवा टॅक्सीची सोय आहे. येथून 117 किलोमीटरवर बैजनाथ येथे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या