Shani 2021 Rashifal : 2021 मध्ये कोणत्या राशीवर शनीची वक्रदृष्टी, कुणाला करणार ‘कंगाल’ अन् कोण होणार ‘मालामाल’ ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सूर्यपुत्र शनीला कर्मफलदातासुद्धा म्हटले जाते. शनीची कृपा असेल तर व्यक्तीची सर्व बिघडलेली कामे हाेऊ लागतात आणि त्यास प्रत्येक कामात यश मिळते. जर शनीची वक्रदृष्टी पडली तर व्यक्तीची होत आलेली कामेसुद्धा बिघडतात. शनीचे गोचर, साडेसाती आणि शनीच्या महादशेत जीवनात मोठ-मोठी परिवर्तने होतात.

विशेष म्हणजे 2021 मध्ये शनीदेव आपली रास बदलणार नाहीत आणि पूर्ण वर्षभर आपली स्वरास म्हणजेच मकर राशीतच विराजमान राहतील. यावर्षी राशीच्या ठिकाणी शनीचे नक्षत्र परिवर्तन होईल. वर्षाच्या सुरुवातीला शनी उत्तराषाढा नक्षत्रात असेल, ज्याचा स्वामी सूर्य ग्रह आहे आणि 22 जानेवारीला श्रवण नक्षत्रात प्रवेश करेल. यानंतर शनीचे उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्रात गोचर होईल. 2021 मध्ये शनी नक्षत्र परिवर्तनाच्या आधारावर जतकांना फळ देईल. मिथुन, सिंह आणि कुंभ राशीवाल्यांना सांभाळून राहावे लागेल. 2021 मध्ये कोणत्या राशींवर शनी मेहरबान राहील आणि कोणत्या राशींना सांभाळून राहावे लागेल ते जाणून घेऊयात…

मेष
2021 मध्ये शनीच्या गोचरचे संमिश्र परिणाम मिळतील. या काळात कार्यक्षेत्रात खुप मेहनत करावी लागेल, परंतु कष्टाचे फळ मिळेल. या काळात वडिलांशी नाते थोडे बिघडू शकते. त्यांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागेल. वडिलांना थोडे शारीरिक त्रास सहन करावे लागू शकतात. काही कारणास्तव, कौटुंबिक जीवनापासून थोडे दूर राहू शकता. 22 जानेवारीनंतर शनी चंद्राचे नक्षत्र श्रवणात प्रवेश करेल. या वेळी वडिलांशी असलेल्या नात्यात काहीसा गोडवा येईल. मात्र, आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. एकंदरीत, वडिलांसाठी शनीचे गोचर चांगले नाही. कार्यक्षेत्रात यश मिळेल.

वृषभ
वर्षाच्या सुरुवातीस शनी उत्तराषाढ नक्षत्रात असेल, ज्यामुळे कौटुंबिक आनंद मिळेल. नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यश मिळेल. उच्च शिक्षण घेतलेल्या जातकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. या काळात मानसिक ताण वाढू शकतो. आर्थिकस्थिती अधिक चांगली होईल. कारण उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. परदेशात जायचे असेल तर या गोचर काळात प्रयत्न करावेत, यश मिळू शकते. बहिण-भावांसाठी काळ चांगला नाही, त्यांना काही समस्या असू शकतात. हा गोचर काळ तुमच्यासाठी खूप चांगला असेल. प्रयत्न केल्यास चांगले फळ मिळेल.

मिथुन
2021 मध्ये शनीच्या गोचरमुळे जीवनात अनेक चढ-उतार येतील. अनेक कामांमध्ये अपयश मिळू शकते. मानसिक ताणतणावदेखील येऊ शकतो. याचा परिणाम लहान भावंडांवरही होऊ शकतो, त्यांनाही त्रास सहन करावा लागू शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या, कारण या गोचर दरम्यान, मिथुन राशीच्या लोकांना काही गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे; अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवून वाटचाल करा, अन्यथा त्यांच्याशीसुद्धा तणाव होऊ शकतो. एकंदरीत, या गोचरने तुमच्यासाठी अनेक समस्या आणल्या आहेत. यावर्षी खूप संयमाने काम करावे लागेल.

कर्क
शनी गोचरमुळे 2021 मध्ये संमिश्र परिणाम मिळतील. उत्तराषाढा नक्षत्रात शनीच्या प्रवेशामुळे जोडीदारास आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गोचरमुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी निगडित लोकांसाठी काळ चांगला आहे. व्यवसायात यश मिळू शकते. व्यवसायात भागीदाराशी काही वाद होऊ शकतात. यावेळी सासरच्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधासाठी काळ खूप चांगला ठरणार आहे. दीर्घकाळापासून असलेले वाद दूर होतील.

सिंह
शनीच्या या गोचरचा तुमच्या आरोग्यावर सर्वांत जास्त परिणाम होईल. खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या वर्षी विरोधकांवर दबाव कायम राखण्यात यश मिळेल. जे स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेणार्‍यांना यश मिळेल. बँकेकडून कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज केला असेल तर गोचर काळात यामध्ये यश मिळू शकते. मात्र, प्रेमसंबंधासाठी हे गोचर चांगले नाही. जोडीदाराबरोबर वाद होऊ शकतो. यावर्षी खर्च वाढू शकतो. परदेश प्रवासाचा प्रबळ योग आहे. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल.

कन्या
शनीचे गोचर तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येत आहे. शनीने उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर संततीला परदेशात जाण्याचे योग आहेत. काही विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अडथळे सहन करावे लागतील. बुद्धीचा वापर विचारपूर्वक करा यातून चांगले फायदे मिळू शकतात. या काळात मानसिक ताण वाढू शकतो. प्रेमसंबंधासाठी गोचर चांगले आहे. काही लोकांचे प्रेमविवाहदेखील होऊ शकतात. श्रवण नक्षत्रातमध्ये शनीच्या गोचरमुळे उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. या काळात तुमच्या आयुष्यात संपत्तीचे स्रोत वाढतील. संक्रमणादरम्यान आपल्याला अधिक कष्ट करावे लागतील.

तूळ
शनीचे गोचर प्रॉपर्टीच्या क्षेत्रासाठी फायदेशीर ठरू शकते. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, गोचर काळात खरेदी करणे चांगले ठरेल. स्वतःचे घर बनवण्याचे स्वप्नदेखील पूर्ण होऊ शकते. सामाजिक दृष्टीने मान-सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात यश मिळेल. आर्थिक बाजू खूप मजबूत होईल. गोचर काळात आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, कारण तिला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरीत मेहनत करूनही योग्य यश न मिळल्याने निराश होऊ शकता. प्रोफेशनल आणि पर्सनल जीवनात ताळमेळ ठेवून वाटचाल करा. आई-वडिलांच्या आरोग्याबाबत सावध राहा.

वृश्चिक
या शनी गोचरमुळे तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. यामुळे जीवनात आनंदच आनंद राहील. गोचर काळात कुटुंबातील सदस्य आणखी जवळ येतील. लहान भावंडांना एखाद्या गोष्टीचा त्रास असू शकतो. या काळातील प्रवासातून फायदा मिळेल. अचानक धनलाभ होण्याचीसुद्धा शक्यता आहे. तसेच भाऊ-बहिणींना परदेशात जाण्याचा योग निर्माण होऊ शकतो. गोचर काळात भाग्याची पूर्ण साथ लाभेल. मोठ्या कालावधीपासून एखादे काम रखडले असेल तेसुद्धा या काळात पूर्ण होईल. आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. आई-वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

धनू
2021 चे शनीचे गोचर धून राशीला सकारात्मक परिणाम देणारे आहे. या काळात भाग्याची पूर्ण साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण खूप चांगले राहण्याची अपेक्षा आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेली एखादी समस्या या काळात नष्ट होईल. या गोचरच्या प्रभावामुळे बहिण-भावंडांची पूर्ण साथ मिळेल. या काळात काही कारणांमुळे कुटुंबापासून दूर जावे लागू शकते. श्रवण नक्षत्रात शनीच्या आगमनानंतर आयुष्यात अचानक धनप्राप्तीचे योग येतील. या काळात वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभदेखील मिळू शकतो. आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण या काळात वडिलांचे आरोग्य थोडे कमजोर राहू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मकर
या गोचरमुळे जीवनात चढ-उताराची स्थिती कायम राहील. शनीच्या उत्तराषाढा नक्षत्र भ्रमणकाळात वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच याकाळात अचानक कुठूनतरी धनप्राप्तीचेसुद्धा योग आहेत. आरोग्याबाबत जागरूक राहा, अन्यथा एखादी मोठी आरोग्य समस्या त्रास देऊ शकते. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कामांना गती मिळू शकते. मकर राशीच्या जातकांच्या दाम्पत्य जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु सासरच्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनातही चढ-उतार येतील. व्यापरातील जातकांना काही कामानिमित्त प्रवास करावा लागेल. या प्रवासातून लाभ होऊ शकतो.

कुंभ
2021 च्या शनी गोचरचा कुंभ राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात एखादी मोठी समस्या उद्भवू शकते. तसेच आरोग्याच्या बाबतीतही खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. स्वतःची आणि जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक पैसे खर्च करा. पायात वेदना होण्याची समस्या होऊ शकते. सोबत निद्रानाशाची समस्यासुद्धा त्रास देऊ शकते. या काळात दूर कुठेतरी फिरायला जाण्याचाही योग निर्माण होऊ शकतो. व्यापरात यश मिळण्याचे योग आहेत. कुठेतरी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर हा काळ योग्य आहे.

मीन
या गोचर काळात मीन राशीला अनेक सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांवर विजय मिळवाल. हे गोचर मीन राशीच्या त्या जातकांसाठी खूप चांगले ठरणार आहे जे शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये भाग घेणार्‍यांसाठी काळ चांगला आहे. अनेक इच्छा पूर्ण होतील. गोचर काळात धनलाभाचासुद्धा योग आहे. एखाद्या परदेशी स्त्रोताकडून लाभ होऊ शकतो, यामुळे उत्पन्न वाढण्याची दाट आशा आहे. कष्टाचे फळ मिळेल. कार्यक्षेत्रात बुद्धी आणि विवेकाच्या बळावर यश मिळवाल. शारीरिकदृष्ट्या हा काळ अनुकूल आहे.