सूर्य-शनी मिळून कशाप्रकारे करतात नात्यावर परिणाम ?, जाणून घ्या त्यांना शांत करण्याचे उपाय

नवी दिल्ली : सूर्याला ग्रहांमध्ये पित्याचे स्थान प्राप्त आहे. वडीलांची स्थिती सूर्यावरून पाहिली जाते. शनीचा (shani ) संबंध रोजगाराशी आहे. तर दुसरीकडे सूर्याचा पुत्र सुद्धा आहे. वडील आणि मुलाच्या संबंधासाठी सूर्य आणि शनीची (shani ) परस्पर स्थिती पाहिली जाते. हे दोन्ही ग्रह सध्या मकर राशीत विराजमान आहेत. कुंडलीमध्ये जर दोन्ही ग्रहांची स्थिती बिघडली तर व्यक्तीच्या नात्यांवर खुप वाईट परिणाम होऊ शकतो.

काय असतो सूर्य आणि शनीचा अशुभ प्रभाव?
वडील आणि मुलातील ताळमेळ खुप खराब होतो. कधी-कधी वडील आणि मुलापैकी एकच जीवंत राहतो. वडीलांसोबत मुलाची विभागणी होते किंवा मुलगा वडीलांना सोडून देतो. कधी-कधी वडील आपल्या मुलासोबत वाईट वागतात. वडील आपल्या मुलाला आपले जीवन आणि संपत्तीपासून दूर करतात.

जर मुलाचे संबंध वडीलांशी खुप खराब असतील
वडीलांनी रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावे. प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या खाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. पिंपळाच्या वृक्षाला 19 वेळा प्रदक्षिणा घालावी. या उपायाने नात्यातील कटूता लवकर दूर होते.

जर सूर्य शनीमुळे एखाद्याच्या जीवनाचे संकट असेल
वडील आणि मुलगा दोघांनी, नियमित सकाळी ‘नमः शिवाय‘चा 108 वेळा जप करावा. शनिवारी दोघांनी काळे तिळ आणि गुळाचे दान करावे. दोघांनीही दरवर्षी श्रावणात श्री शंकराचा रुद्राभिषेक केला पाहिजे.

जर वडील आपल्या मुलाशी वाईट वागत असतील
मुलाने नियमित सकाळी काळे तिळ मिसळून सूर्याला जल अर्पण करावे. रविवारचा उपवास ठेवावा, या दिवशी मीठ खाऊ नये. काळ्या रंगाच्या कपड्यांचा कमीत कमी वापर करावा.

जर मुलगा वडीलांशी वाईट व्यवहार करत असेल
वडीलांनी नियमित सकाळी कुंकु मिसळलेले जल सूर्याला अर्पण करावे. रोज सायंकाळी भगवान विष्णुंना पिवळे फूल अर्पण करावे. लाल रंगाचे वस्त्र कमीत कमी वापरावे.