Shani Dev | 2022 मध्ये अडीच वर्षानंतर ’शनी’ बदलणार ‘रास’, जाणून घ्या कुणाला सुरू होईल ‘अडीचकी’ आणि ‘साडेसाती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Shani Dev | कुंभ राशीत शनी गोचर करताच दोन राशीच्या जातकांना ’शनी अडीचकी’ सुरू होईल तर एका राशीला ’शनी साडेसाती’. 2022 मध्ये 1 जानेवारीपासून 29 एप्रिलपर्यंत मिथुन आणि तुळ राशीला शनी अडीचकी राहिल. यानंतर कर्क आणि वृश्चिकच्या जातकांना अडीचकी सुरू होईल जी 12 जुलैपर्यंत राहिल. 12 जुलैपासून शनी वक्री आवस्थेत पुन्हा एकदा आपली मागील रास मकरमध्ये प्रवेश करेल. मकर राशीत शनीचे गोचर होताच मिथुन आणि तुळ राशीच्या जातकांना पुन्हा शनीची अडीचकी लागेल आणि 17 जानेवारी 2023 पर्यंत त्यांना शनीच्या दशेचा सामना करावा लागेल. (Shani Dev)

 

शनीची चाल
ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व ग्रहांमध्ये शनीची चाल सर्वात संथ सांगितली जाते. शनीदेवाला आपले राशीचक्र पूर्ण करण्यास सुमारे 30 वर्षाचा काळ लागतो.

 

शनी साडेसाती 2022
पंचांगानुसार 2022 मध्ये 1 जानेवारीपासून 29 एप्रिलपर्यंत धनु, मकर आणि कुंभ राशीच्या जातकांना शनी साडेसाती राहिल. 29 एप्रिलला शनीने कुंभ राशीत प्रवेश करताच मीन राशीच्या जातकांना शनी साडेसाती सुरू हाईल. तर धनु राशीवाल्यांना यापासून मुक्ती मिळेल. तर मकर राशीवाल्यांना तिचा शेवटचा टप्पा सुरू होईल आणि कुंभवाल्यांचा दुसरा टप्पा सुरूहोईल. (Shani Dev)

शनी 12 जुलैपर्यंत कुंभ राशीत राहिल्यानंतर पुन्हा मकर राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे धनु राशीवाल्यांना पुन्हा शनी लागेल. तसेच मीन राशीवाले 17 जानेवारी 2023 पर्यंत शनि साडेसातीपासून मुक्त राहतील.

 

या दरम्यान मकर आणि कुंभ राशीच्या जातकांना सुद्धा शनी साडेसाती राहिल.
2022 मध्ये 8 राशींवर शनीची नजर राहिल आणि 4 राशी शनीच्या दशेपासून मुक्त राहतील.
मेष, वृषभ, सिंह आणि कन्या या राशी शनीच्या दशेपासून मुक्त राहतील.

 

(Disclaimer : देण्यात आलेली माहिती केवळ मान्यता आणि सार्वजनिक जीवनात बोलण्यात येणार्‍या गोष्टींवर आधारित आहे.
www.policenama.com
कोणत्याही प्रकारची मान्यता अथवा माहितीला दुजोरा देत नाही.
कोणतीही माहिती अथवा मान्यता अंमलात आणण्यापुर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा)

 

 

Web Title :- Shani Dev | in 2022 shani dev is going to change the zodiac know on which dhaiya and sade sati will start

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bathroom Stroke | हिवाळ्यात येणाऱ्या बाथरूम स्ट्रोकबद्दल तुम्हाला माहिती आहे?, जाणून घ्या कशी घ्यावी खबरदारी

Pune Crime | पुणे ग्रामीणची मोठी कारवाई ! यवत पोलिसांकडून पाटस परिसरात 50 लाखांच्या गांजासह 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक

NPS Traders | राष्ट्रीय पेन्शन योजना देते छोट्या व्यापार्‍यांना वृद्धत्वात पेन्शनचा आधार, जाणून घ्या सरकारी योजनेचा कसा घ्यायचा लाभ