Shani Gochar 2022 | शनि साडेसातीचा काळ सुरू होतोय; ‘या’ राशीच्या लोकांना व्हावं लागेल अलर्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Shani Gochar 2022 | ग्रह राशी (Zodiac) बदलतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर (Shani Gochar 2022) परिणाम होतो. असं वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येतं. याचप्रमाणे 2022 च्या नवीन वर्षामध्ये अनेक ग्रह राशी बदलतील. तसेच शनिदेवही राशी बदलणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून ही स्थिती महत्वाची आहे. तर, 29 एप्रिलला शनिदेव (Shanidev) स्वतःच्या राशीमध्ये कुंभ (Aquarius) राशीत प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे. यानंतर शनीचा वाईट प्रभाव कुंभ राशीच्या लोकांवर पडणार आहे. त्याचबरोबर मकर, मीन, कर्क आणि वृश्चिक राशींवरही याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

 

– कुंभ :

वैदिक ज्योतिषशास्त्रानूसार या (Aquarius) राशीच्या लोकांचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. हा टप्पा सर्वात त्रासदायक मानला जातोय. याचे कारण या काळात शनि साडेसातीचा प्रभाव त्याच्या शिखरावर असतो. या काळामध्ये व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शनि जर एखाद्या व्यक्तीच्या उदर भावात असेल तर पोट, हृदय, किडनीशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. (Shani Gochar 2022)

 

– एखाद्या नातेवाईकांकडून किंवा मित्राकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे.

– कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो.

– व्यवसायातही कठोर परिश्रम घ्यावे लागतात.

– अपघातात जखमी होण्याची शक्यता आहे.

– आर्थिक नुकसान होऊ शकते.

– या काळात अनेक संकट येतात.

 

दरम्यान, वरील प्रमाणे अशा अडचणी येत असल्या तरी साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात शनिदेव व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या मजबूत करतोय. परंतु , कुंडलीत शनिदेव कोणत्या स्थानात आहेत यावर सगळं अवलंबून असतं.

– मकर :
शनि गोचरचा प्रभाव मकर (Capricorn) राशीच्या लोकांवरही घडतो. मकर राशीच्या लोकांच्या शनि साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु होईल.

 

– मीन :
शनि गोचरचा प्रभाव मीन (Pisces) राशीच्या लोकांवरही होईल. तर, मीन राशीच्या लोकांसाठी पहिला टप्पा सुरु होईल.

 

– धनु :
धनु राशीच्या (Sagittarius) लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल.

 

– कर्क आणि वृश्चिक :
कर्क आणि वृश्चिक राशीचे (Cancer and Scorpio) लोक शनी ढय्याखाली येतील.

 

– मिथुन आणि तूळ :
मिथुन आणि तूळ राशीच्या (Gemini and Libra) लोकांची ढय्येतून मुक्तता होईल.

 

टीप : वरील दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यावरून आम्ही (www.policenama.com) कुठलाही दावा करत नाही.

 

Web Title :- Shani Gochar 2022 | shani gochar 2022 sadesati for kumbh makar and meen rashi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | महाराष्ट्र खंबीर ! उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – ‘2 वर्षांच्या काळात सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या तमाम बंधुभगिनी, मातांचे, युवा मित्रांचे आभार’

 

Ajit Pawar | विना मास्क 500 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास थेट 1000 रुपये दंड आकारण्याचे अजित पवारांचे निर्देश

 

Restrictions in Maharashtra | राज्यात निर्बंध वाढणार? अजित पवारांनी सांगितलं…