Shani Gochar 2022 | काही दिवसातच शनीदेव उजळवणार ‘या’ 4 राशींचे नशीब, होईल फायदाच फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Shani Gochar 2022 | ज्योतिष शास्त्रात ग्रहांचे राशी परिवर्तन खुप विशेष मानले जाते. कारण याचा प्रभाव प्रत्येक मनुष्याच्या जीवनावर पडतो. सर्व 9 ग्रह नियमित अंतराने राशी बदलतात. यामध्ये शनीचे राशी परिवर्तन विशेष मानले जाते. शनीची चाल खुप संथ असते. (Shani Gochar 2022)

 

शनीदेव एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतात. अशाप्रकारे सर्व राशीमध्ये भ्रमण करण्यास शनीला 30 वर्षांचा कालावधी लागतो. 30 वर्षानंतर शनीदेव 29 एप्रिल 2022 ला कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे राशीचक्रातील 4 राशी अतिशय भाग्यशाली ठरतील. या चार राशींबाबत जाणून घेवूयात.

 

1. धनु (Sagittarius)
कुंभ राशीतील शनीचे गोचर या राशीची साडेसाती समाप्त करेल. शनिदेवाची विशेष कृपा राहील, ज्यामुळे चांगले दिवस येतील. नोकरीत प्रतिष्ठा वाढेल. यासोबतच आर्थिक संकटातून सुटका मिळेल. वडिलांच्या मालमत्तेतून प्रचंड फायदा होईल. शारीरिक त्रासातून आराम मिळेल. याशिवाय व्यवसायात खूप प्रगती होईल.

 

2. वृषभ (Taurus)
शनीच्या राशी बदलानंतर चांगला काळ येईल. करिअरमध्ये प्रगती होईल. नोकरी किंवा व्यवसायात आर्थिक बाजू मजबूत राहील. परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण होईल. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा पूर्ण लाभ मिळेल. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील. परदेशातूनही नोकरीची संधी मिळू शकते. शनीचे गोचर सुखाचे साधन वाढवेल. (Shani Gochar 2022)

3. सिंह (Leo)
शनीने कुंभ राशीत प्रवेश करताच वाईट काळापासून सुटका होईल. यासोबतच तुम्ही नव्या आयुष्याची सुरुवात कराल. शनी गोचर काळात भरपूर धनलाभ होईल. याशिवाय घर किंवा जमिनीत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरीत प्रगती होईल. व्यापारी माणसाचा व्यवसाय वाढेल. कायदेशीर मदत मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

 

4. मेष (Aries)
29 एप्रिल रोजी शनि-गोचरनंतर मेष राशीच्या लोकांना करिअर किंवा नोकरीत उत्तम संधी मिळेल.
आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.
व्यवसायात आर्थिक प्रगती करू शकाल. नवीन व्यवसाय उघडणे फायदेशीर ठरेल.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, आम्ही यावरून कुठलाही दावा करत नाहीत.)

 

Web Title :- Shani Gochar 2022 | shani gochar 2022 saturn transit beneficial for these 4 zodiacs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TATA AIA Life Insurance | ‘या’ प्लानमध्ये ABD, HCB पासून प्रीमियमच्या 105% रिटर्न मिळवण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर

 

PMSYM | सरकारकडून दरमहिना रू. 3000 मिळवण्यासाठी इथं 46 लाखापेक्षा जास्त लोकांनी केले रजिस्ट्रेशन, जाणून घ्या काय आहे योजना आणि कसा करावा अर्ज?

 

IPS Sanjay Latkar | नांदेडचे सुपुत्र आणि झारखंडचे अपर पोलीस महासंचालक संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर