‘शनी’चं दुसरं चरण प्रचंड ‘घातक’, 2020 मध्ये एका राशीवर चालणार हे ‘चरण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनीच्या साडेसातीला सर्व लोक घाबरतात आणि हीच प्रार्थना करतात की, आपल्यावर कधीही साडेसाठी सुरु होऊ नये. शनी न्यायाची देवता आहे. शनी मेहनती आणि इमानदार लोकांवर नेहमीच कृपा ठेवतात. ज्योतिष शास्त्रानुसार शनी कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात एक किंवा दोन वेळा शनीची साडेसाती नक्की येते.

एका राशीत अडीच वर्ष राहतो शनी
एका राशीपासून दुसर्‍या राशीत जाण्यासाठी शनी देवाला सुमारे अडीच वर्षे लागतात. ज्योतिष शास्त्रानुसार शनी ज्या राशीमध्ये आहे तिच्यावर शनीचा प्रभाव राहतो, तसेच शनीचा कालावधी साडेसात वर्षे आहे कारण तो राशींमधील पहिल्या आणि शेवटच्या राशीवर प्रभाव टाकतो. म्हणूनच हा काळ शनीची साडेसाती म्हणून ओळखला जातो.

2020 मधील असा असेल शनी
24 जानेवारी 2020 पासून शनी मकर राशीत प्रवास करेल. अशा परिस्थितीत धनु राशीमध्ये शनीचा शेवटचा टप्पा, मकर राशीमध्ये दुसरा आणि कुंभ राशीमध्ये शनीचा पहिला टप्पा सुरु होईल. दुसरा टप्पा खूप कष्टदायक मानला जातो. अशा वेळी मकर राशीतील लोक शनीच्या घेऱ्यामध्ये येणार आहेत.

मकर राशीवर शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्याचा परिणाम
शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सगळ्यात घटक समजला जातो. जो या टप्प्यात सापडतो त्याला आयुष्यात अनेक संकटाना सामोरे जावे लागते. साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात व्यक्तीला सुख सुविधांचा लाभ मिळत नाही. उत्पन्नाची साधने कमी असतात आणि खर्च जास्त होत जातो. आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/