‘या’ 3 राशींच्या मागे ‘शनि’ची ‘साडेसाती’ तर ‘या’ २ राशींवर ‘नजर’, ‘दोष’ दूर करण्यासाठी ‘हे’ 7 उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ज्योतिषीशास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्व दिले जाते. या ग्रहाला सर्वाधिक अशुभ ग्रह समजले जाते. कुंडलीत शनि असल्याने व्यक्तींना अनेक गंभीर परिस्थितींना सामोरे जावे लागते.
शनिचा एकाच वेळी ५ राशींवर थेट परिणाम पाहायला मिळतो. एकच वेळी ३ राशींवर शनिची साडेसाती आणि २ राशींवर प्रभाव नक्की असतो. शनि एकाच राशीमागे जवळपास अडीच वर्ष कायम राहतो.
सध्या शनि धनु राशीमागे आहे. यामुळे वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर शनिची साडेसाती आहे. तर वृषभ आणि कन्या राशीवर शनिचा प्रभाव आहे.

या शनि दोषाला कमी करण्याचे उपाय आहेत –

१. शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी त्यांना तेल चढवा आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करा.
२. शनिला काळ्या तीळाचे दान करा. याशिवाय चमड्याच्या चप्पलेचे दान करणे देखील शुभ मानले जाते.
३. शनि देव त्या लोकांना अशिर्वाद देतात. जे मेहनत करतात आणि गरिबांना अन्नदान करतात. जे व्यक्ती गरिबांचा अपमान करतात त्यांच्यावर शनि देवता कृपा दृष्टी दाखवत नाही.
४. शनि वृक्षाच्या मुळांना काळे कपडे बांधून शनिवारी संध्याकाळी डाव्या हाताला बांधावे किंवा ऊँ प्रां प्री पौं स: शनिश्चराय नम: असा जप करावा.
५. सुंदरकांडाचे पठन करावे आणि हनुमान देवतेच्या मंदिरात जाऊन त्यांना गोड प्रसाद चढवावा.
६. शनि देवतेच्या प्रकोपाला शांत करण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी ठरेल. या मंत्राचा श्रद्धेने जप केल्यास निश्चित लाभ मिळेल.
सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष: शिव प्रिय:।
मंदाचाराह प्रसन्नात्मा पीड़ां दहतु में शनि:।।
७. शनि संबंधित दोष दूर करण्यासाठी आणि त्यांच्या कृपा राहावी. यासाठी शिवाची उपासना करावी.

आरोग्यविषयक वृत्त –