धनु राशीतून बदलणार शनि चाल, जाणून घ्या काय होणार 12 राशींवर परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 18 सप्टेंबरला म्हणजेच आज ग्रहांचे न्याय देवता शनि आपली चाल बदलणार आहे. हा ग्रह सध्या धनू राशीसाठी वक्र आहे, परंतू 18 तारखेनंतर त्याची चाल सरळ होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 2.14 मिनिटांनी शनि मार्गी लागेल. 30 एप्रिल 2019 पासून शनिची चाल वाकडी होती. शनि याच स्थिती 25 जानेवारी 2020 पर्यंत असेल. परंतू आता शनिचा प्रभाव जास्त वाढेल. याचा परिणाम राशींवर होणार आहे.

1. मेष रास
meshpng
या राशीच्या लोकांच्या मार्गी असलेला शनि व्यवसाय, नोकरी आणि धन प्राप्तीत वाढीसह अनेक समस्येत यश देईल.
उपाय – हनुमानाच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि ‘शं मंत्रा’चा 11 वेळ जप करा.

2. वृषभ रास –
Vrishabh
या राशीच्या अष्ठम भावात मार्गी असलेला शनि कामात अडचणींसह मनात निराशा आणेल, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.
उपाय – पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि मातेचे चरण स्पर्श करुन अशिर्वाद घ्या.

3. मिथुन रास –
mithun
या राशीच्या सप्तम भावामधील मार्गी असलेला शनि व्यवसायात प्रगतीबरोबरच दांपत्य जीवनात काही समस्या आणू शकतो.
उपाय – तुमच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटात काळ्या घोड्याच्या नाळीची रिंग शनिवारी संध्याकाळी घाला.

4. कर्क रास –
karka

या राशीच्या सहाव्या भावाच्या मार्गी असलेला शनि वाद वाढवण्याबरोबर तुमच्या समस्या वाढवेल, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा.
उपाय – शिवशंकराच्या मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि शिवाष्टकाचे पठन करा.

5. सिंह रास –
sinha
या राशीच्या पाचव्या भावामध्ये मार्गी असलेला शनि व्यवसायातील समस्या सोडवण्याबरोबरच अडकून राहिलेले पैसे तुम्हाला मिळवून देईल.
उपाय – हनुमान चाळीसाचे पठण करा आणि पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण करा.

6. कन्या रास –
kanya
या राशीच्या मार्गी असलेला शनिमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो पंरतू मेहनतीनंतर तुम्हाला यश मिळेल.
उपाय – शनिवारी पिंपळाच्या वृक्षाला सात प्रदक्षिणा घाला आणि हनुमानाला गुळाचा नैवेद्य दाखवा.

7. तुळ रास –

tula
या राशीत असलेला शनि संतान प्राप्तीची समस्या संपवले, तसेच अडून राहिलेल्या कामांना गति मिळेल.
उपाय – शमीच्या झाडापाशी तिळाच्या तेलचा दिवा लावा आणि हुनमान चाळीसाचे पठण करा.

8. वृश्चिक रास –
vruchik
या राशीला असलेला शनि जमीन व्यवहार, संपत्ती यातील समस्या संपवेल. तसेच मेहनत केल्यास प्रत्येक कामात यश मिळेल.
उपाय – शनिवारी किंवा मंगळवारी सकाळी सुंदरकांडचे पठण करा आणि हनुमानाला लाडूचा नैवेद्य दाखवा.

9. धनू रास –
dhanu
या राशीच्या जीवनात असलेल्या शनिमुळे जोडीदाराच्या आरोग्यावर परिणाम होईल, तर भावा बहिणींचे वाद संपतील.
उपाय – पश्चिम दिशेकडे तोंड करुन शनिच्या वैदिक मंत्राचा जप करा आणि पिंपळाच्या वृक्षाची सेवा करा.

10. मकर रास –
MAKAR
या राशीच्या जीवनात शनि असल्याने परदेश प्रवासाचा योग आहे त्याबरोबर खर्च देखील होऊ शकतो तसेच जबाबदारी देखील घ्यावी लागू शकते.
उपाय – ऊँ शं शनिश्चराय नम: मंत्राचा 108 वेळा जप करा. पिंपळाच्या झाडाची सेवा करा.

11. कुंभ रास –
kumbha
या राशीला शनि असल्याने आरोग्याच्या अनेक समस्या संपू शकतात, तसेच मान सन्मान वाढेल.
उपाय – शनिवारी सकाळी बजरंग बाणचे पठण करावे आणि गरजूंना अन्नदान करावे.

12. मीन रास –
min
या राशीला शनि असल्याने विनाकारण खर्चात वाढ होईल. तसेच नोकरी व्यवसायात लाभ होईल.
उपाय – रात्री शनि चाळीसाचे पठण करा आणि गोड पान गणेशाला अर्पण करा.

ज्योतिषी आर. एच. सोनी
संपर्क (7410110048/49) 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like