‘पानिपत’ साठी एन. डी. स्टुडिओत साकारला शनिवार वाडा 

मुंबई : वृत्तसंस्था

 

ऐतिहासिक चित्रपट निर्मिती करण्यात हातखंडा असलेले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर “पानिपत ” नावाचा चित्रपट बनवत आहे . पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित हा चित्रपट आहे . दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीत नेहमीच सखोल तपशील आणि संदर्भ याबाबत अधिकच जागरूक असतात. आता ते मराठ्यांच्या  इतिहासावर आधारित  ‘पानिपत ‘ या ऐतिहासिक  चित्रपटाची निर्मिती करीत असून त्यासाठी नितिन चंद्रकांत देसाई हे कला दिग्दर्शन करीत आहेत.चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबई पासून ६० किलोमीटर असणाऱ्या कर्जत येथे  या चित्रपटासाठी भव्यदिव्य सेट बनविण्यात आला आहे .

[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f3be77eb-af3a-11e8-8446-fb5a3408dbde’]

नितिन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत त्यासाठी भव्य सेट लावण्यात येत असल्याचे एका छायाचित्रातून सोशल मिडियात पोस्ट करुन सांगण्यात आले आहे. एन. डी. स्टुडिओत शनिवारवाड्याचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. किक, जोधा अकबर, स्लमडॉग मिलियनेयर, बाजीराव मस्तानी, प्रेम रतन धन पायो यासांसारख्या चित्रपटांचे चित्रीकरण एन .डी . स्टुडिओत झाले आहे .

जाहिरात

चित्रपटाची कहाणी मराठ्यांच्या पानिपतच्या लढाईवर आधारित आहे . या ऐतिहासिक चित्रपटात  संजय दत्त, अर्जुन कपूर, कृति सेनन और कबीर बेदी हे कलाकार भूमिका निभावत आहेत .

‘ही’ अभिनेत्री साकारणार आता नवीन शनाया