Shankar Sampate Suspended | पुण्यातील अवैध धंद्देवाल्यांशी WhatsApp कॉलिंगवर सदैव संपर्कात राहणारा पोलीस कर्मचारी शंकर संपते निलंबित; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shankar Sampate Suspended | पुणे शहर (Pune Police) पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बेकायदेशीर व्यवसाय ( अवैध धंद्देवाल्यांशी) करणार्‍यांबरोबर वारंवार WhatsApp कॉलिंगवर संपर्कात राहिल्याने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस नाईक शंकर शिवाजी संपते (Police Shankar Shivaji Sampate) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस उपायुक्त विवेक पाटील (DCP Vivek Patil) यांनी हा आदेश काढला आहे. (Shankar Sampate Suspended)

 

 

शंकर संपते (Shankar Sampate) हे यापूर्वी पोलिस आयुक्तालयातील अनेक आस्थापनेवर कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी शंकर संपते यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आल्यानंतरही ते सातत्याने बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांच्या संपर्कात असल्याची माहिती अति वरिष्ठ अधिकार्‍यांना मिळाली. त्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात शंकर संपते (Shankar Sampate Suspended) हे वारंवार व्हॉटसअ‍ॅप कॉलिंगवर शहरातील बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांशी संपर्कात असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले. त्यामुळे पोलीस अंमलदारास अशोभनीय वर्तन केल्याचा ठपका ठेवून पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी त्याला शहर पोलीस दलातून निलंबित केले आहे.

 

 

या कारवाईमुळे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
अनेकजण पुढे मागे आपला कॉल रेकॉर्ड म्हणून पुरावा समोर येईल, म्हणून व्हॉटपअ‍ॅप कॉल करत असतात.
शंकर संपते प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक चौकशीत त्यांच्या व्हॉटसअ‍ॅप कॉल रेकॉर्डची तपासणी केली.
त्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अशा प्रकारे व्हॉटप अ‍ॅप कॉलवर भिस्त ठेवणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, प्रकरणावर अति वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष ठेऊन आहेत.

 

Web Title :- Shankar Sampate Suspended | Shankar Sampath, a police who was always in touch with illegal traders in Pune on WhatsApp calling is suspended; Know the case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा