पुण्याच्या NCL मधील मराठी शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील ‘नोबेल’ समजल्या जाणाऱ्या ‘शांतीस्वरूप भटनागर’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये पुण्याच्या एनसीएलमधील मराठी शास्त्रज्ञाने बाजी मारली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या (Council of Scientific and Industrial Research ) वतीने नुकतेच हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेचा समाजला जाणारा हा पुरस्कार आहे.

पुण्यातील डॉ. अमोल कुलकर्णी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. कुलकर्णी हे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागात कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा भटनागर पुरस्कार जाहीर करून गौरव करण्यात आला आहे. डॉ. कुलकर्णी यांचे ‘चांदीच्या नॅनोवायर’चे उत्पादन करणारे संशोधन खूप प्रसिद्ध झाले होते.

मागील वर्षी (२०१९) १२ जणांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यामध्ये पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयसर) शास्त्रज्ञ डॉ. साईकृष्णन कायराट यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरुप पाच लाख रुपये रोख आणि १५ हजार रुपये दरमहा मानधन असे आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like