Beauty Secrets : घरबसल्या न घाबरता Eyebrow ला परफेक्ट शेप, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महिलांना आयब्रो व अपर लिप्स याची अधिक काळजी असते. कारण, चेहऱ्यावरील अनावश्यक केस स्त्रियांचे सौंदर्य खराब करते. डोळ्यांच्या सौंदर्यासाठी भुवया आकारात असणे आवश्यक आहे. परंतु, भुवयांना परिपूर्ण आकार देण्यासाठी महिलांना दरमहा ब्युटी पार्लरमध्ये जावे लागते. थ्रेडिंगशिवाय आपण घरी भुवयांना एक परिपूर्ण आकार देऊ शकतो तर मग जाणून घेऊया.

गरम पाणी सर्वात महत्त्वाचे आहे
कॉटन बॉलच्या सहाय्याने भुवयांना गरम पाणी लावा. कोमट पाणी वापरल्याने भुवयांच्या केसांची मुळे मऊ होतात, ज्यामुळे केस सहजपणे निघतात. हे लक्षात ठेवावे की पाणी जास्त गरम होऊ देऊ नका. जर पाणी जास्त गरम झाले तर त्वचा जळण्याचा धोका असतो.

भुवयांना पेन्सिलने द्या आकार
पेन्सिलने आपल्या भुवयाची आउटलाइन काढा आणि त्यास आकार द्या. असे केल्याने भुवया खराब होणार नाहीत आणि आपल्याला इच्छित आकार मिळेल.

प्लकरच्या मदतीने भुवया काढा
भुवयावर पावडर लावा आणि प्लकरच्या मदतीने केस काढा.

मॉइश्चरायझर लावा
थ्रेडिंग प्रक्रिया संपल्यानंतर, भुवयांवर चांगल्या प्रतीची ब्युटी एजंट किंवा मॉइश्चरायझर लावा. यामुळे केसांची वाढ होणार नाही आणि संसर्ग होण्याचा धोका नाही.