कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी 12 आरोपींची नावे पुढे, 3 जण नवीन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापुरातील स्थानिक दोघांचा व कर्नाटकतील एकाचा अशा तिघांचा सहभाग असल्याची कबुली शरद कळसकर याने दिली आहे. त्यांना लवकर अटक करण्यात येईल, असे संकेत एस आयटीने दिले आहेत.

अनिसचे कार्याध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी शरद कळसकर याला सीबीआयने अटक केली होती. त्याच्या ताब्यातून एसआयटीने कळसकरला घेतले होते. गोंविद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील शरद कळसकर हा नववा आरोपी आहे़ त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात त्याने या हत्येत आणखी तिघांचा सहभाग असल्याची कबुली दिली आहे. त्यातील दोघे कोल्हापूरचे तर, एक जण कर्नाटकचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कळसकरच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्यासमोर हजर केले असता ८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रात्री उशिरा मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात रवानगी केली.

आरोग्य विषयक वृत्त

नेहमीच जेवणावर ताव मारत असाल तर होऊ शकतो ‘हा’ त्रास

व्यायामानंतर ‘या’ ७ चुका टाळा ; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

अमेरिकन डॉक्टरांनी केलं ‘ घड्याळाद्वारे ‘ हृदयरोगाचे निदान

महाराष्ट्राभोवती कॅन्सरचा विळखा घट्ट ; रुग्णांची संख्या वाढली