Post_Banner_Top

काॅम्रेड पानसरे हत्याप्रकरण : शरद कळसकरने अग्‍नीशस्त्रांची ‘विल्हेवाट’ लावली

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कॉमरेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकरला एनआयएच्या (राष्ट्रीय तपास यंत्रणा) ताब्यातून एसआयटीने अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणांत शरद कळसकर सहभाग

मुंबईत सापडलेल्या शस्त्रसाठ्यासह पुण्यातील डॉ. नरेंद्र दाभोलकर, कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातही त्याचा सहभाग आहे. तर कॉमरेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील शस्त्रांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कळसकरवर होती असा दावा एसआयटीने न्यायालयात केला.

शस्त्रांची विल्हेवाट लावण्याची कळसकरवर जबाबदारी

पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर गुन्ह्यातील शस्त्रे कोवाडमार्गे बेळगावला पोहोचविण्यात आली. हे काम भारत कुरणे आणि सागर लाखे या दोघांनी केले. त्यानंतर शस्त्राचे पार्ट काढून त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी शरद कळसकर याच्यावर सोपविण्यात आली होती. पानसरे यांच्या हत्येच्या चार ते पाच दिवस आधीच कोल्हापूरमध्ये वास्तव्यास होता. त्याने कोल्हापूरमधील काही मित्रांशीही वारंवार मोबाईलवरून संभाषण केले होते. या पुराव्यांच्या आधारे एसआयटीने मुंबई येथून न्यायालयाच्या परवानगीने कळसकरला अटक केली.

 

 

आरोग्यविषयक वृत्त –

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

Loading...
You might also like