Sharad Kelkar | शरद केळकरने आदिपुरुषमधील प्रभासच्या व्यक्तिरेखेला आपला आवाज देण्याबाबत केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन : Sharad Kelkar | ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटातील व्हीएफएक्स असो किंवा राम आणि रावणाच्या व्यक्तिरेखा असो याविषयी अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये एक सकारात्मक गोष्ट जी प्रेक्षकांना खूपच आवडली ती म्हणजे या चित्रपटातील प्रभासचा हिंदीतील आवाज मराठमोळ्या शरद केळकरचा दमदार आवाज आहे. जो आवाज प्रेक्षकांना कायमच सुखावतो. आता याबाबत शरद केळकरने एक मोठा खुलासा केला आहे. (Sharad Kelkar)

या चित्रपटातील प्रभासच्या हिंदी भूमिकेसाठी शरद केळकरने आवाज दिला आहे. या भूमिकेमुळे शरद स्वतःला खूपच भाग्यवान समजतो. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की “या चित्रपटात प्रभू श्रीरामांना माझा आवाज मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. या भूमिकेसाठी माझा आवाज हवा आहे या मतावर ओम राऊत हे पहिल्याच दिवसापासून स्पष्ट होते. या गोष्टीमुळे मला खूपच आनंद झाला. प्रेक्षकांनी आत्तापर्यंत मला बाहुबलीचा आवाज म्हणून मान दिला होता तर आता श्रीरामांचा आवाज म्हणून मी प्रेक्षकांच्या स्मरणात राहील”. (Sharad Kelkar)

याच मुलाखतीत त्यांना दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला होता की, तेलुगु चित्रपट ‘हनुमानच्या’ टीझरमध्ये प्रेक्षकांनी प्रभावी व्हीएफएक्स पाहिल्यानंतर आदिपुरुषवर झालेल्या टीकेबद्दल तुम्हाला काय वाटते. यावर बोलताना शरद म्हणाले, “मी केवळ माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत असतो. या सगळ्या गोष्टींपासून मी लांबच असतो. शिवाय मी हनुमानचा ट्रेलरही पाहिला नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणे योग्य नाही”. (Prabhas)

शरद केळकरनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.
एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या दमदार आवाजाच्या जोरावर अनेकांना आश्चर्यचकित केले आहे.
तर नुकतेच ते ‘हर हर महादेव’ मध्येदेखील दिसले होते. यापूर्वी कोड नेम तिरंगा, ऑपरेशन रोमियो आणि भुजमध्येही
दिसले होते. एवढेच नाही तर 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या लक्ष्मी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने तर लोकांनी
त्यांचे तोंड भरून कौतुक केले होते.

Web Title :- Sharad Kelkar | sharad kelkar dubs for prabhas in adipurush says fortunate shri ram chose me to be his voice

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kriti Sanon | क्रिती सेनॉनची ‘ती’ पोस्ट चर्चेत; केला मोठा खुलासा

Pune Police | सर, हम कामकाज देखें क्या? पुण्यातील नवनियुक्त उपायुक्त म्हणाले – ‘दुबारा इधर मत दिखना, छोडूंगा नही’, जाणून घ्या प्रकरण

Ravrambha | ‘रावरंभा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित ! ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील कलाकार साकारणार महत्त्वाची भूमिका