कुख्यात शरद मोहोळच्या वाढदिवसानिमित्‍त फ्लेक्सबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात गुंड शरद मोहोळच्या वाढदिवसाचे फ्लेक्स शहरात काही ठिकाणी झळकल्याने खळबळ उडाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात भला मोठा फ्लेक्स झळकत असल्याचे पहावयास मिळत आहे. हा फ्लेक्स नेमका कोणी लावला हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी त्याच्या समर्थकांनी हा फ्लेक्स लावल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि अपहरणासह अनेक गंभीर गुन्हयांची नोंद शरद मोहाळविरूध्द आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण आणि खंडणीच्या गुन्हयात त्याला पोलिसांनी काही वर्षांपुर्वी अटक केली होती. येरवडा कारागृहात असताना त्याने दहशतवादाच्या आरोपाखाली अटक असलेला कतिल सद्दिकीचा खून केला होता. त्यावेळी येरवडा कारागृहातच सिद्दीकीचा खून झाल्याने देशभर खळबळ उडाली होती. त्यानंतर पासुन शरद मोहोळला हिंदुत्व शौर्याचे प्रतिक म्हणून बिरूद लावले जात आहे. पुणे जिल्हयातील मुळशी तालुक्यात मोहोळची प्रचंड दहशत होती. पौड आणि परिसरात त्याची टोळी त्यावेळी सक्रिय होती. दि. 7 जानेवारी रोजी शरद मोहोळचा वाढदिवस आहे. त्यानिमित्‍त हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी विद्यापीठ चौकात फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे.