‘त्या’ खून प्रकरणी कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळला उच्च न्यायालायाकडून जामीन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याला किशोर मारणे याच्याखून प्रकरणी पुणे सत्र न्यायालायने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याप्रकऱणात त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याला उच्च न्यायालायने जामीन मंजूर केला आहे. परंतु त्याच्यावर सध्या येरवडा कारागृहात अंडा सेलमध्ये असलेल्या दहशतवादी कतील सिद्दीकी याचा खून केल्याप्रकऱणी खटला सुरु आहे. त्यामुळे त्याला अद्याप सोडण्यात आले नाही.

किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहोळ याला पुणे सत्र न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात त्याने उच्चन्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्यावतीने एड. हर्षद पांडा, शमशेर गरुड यांनी त्याच्यावतीने न्यायालयात अर्ज सादर केला. त्याला सुनावण्यात आलेली शिक्षा ही विजय मारणे याने दिलेल्या साक्षीवर आधारित आहे. त्याने कुठेही म्हटले नाही की, शरद मोहळ त्यावेळी तेथे होता. तसेच त्याची या सर्व प्रकारात काय भूमिका होती.

जरी त्याचे नाव एफआयआरमध्ये असले तरी त्याची भूमिका या सर्व प्रकारात काय होती. हे नमूद नाही. ओळख परेड झाली तेव्हा मारणे याने केवळ तीन जणांना ओळखले. याप्रकरणात आणखी एका आरोपीला जामीन झाला आहे. याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तर विजय मारणे हा या गुन्ह्यातील साक्षीदार आहे. त्याने या गुन्ह्यात शरद मोहोळचे नाव घेतले आहे. असा युक्तीवाद सरकारी पक्षाने केला.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. न्यायालयाने म्हटले की, साक्षीदारांनी केवळ तिघांनाच ओळखले आहे. त्यात कुठेही चौथ्या व्यक्तीचा समावेश आहे असे दिसत नाही. त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याला रोज अतिरिक्त सत्र न्यायालयात पोलीस अधिक्षकांसमोर रोज हजेरी लावावी लागे.

टोळीयुद्धातून २०१० मध्ये कोथरुड येथील गुंड गणेश मारणे टोळीची आर्थिक सुत्रे सांभाळणाऱ्या किशोर मारणे याचा गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. ११ जानेवारी २०१० रोजी निलायम थिएटरजवळ त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी शरद मोहोळ याच्यासह सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर २७ वर्षीय शरद मोहोळ ये कारागृहात असताना आलोक भालेराव याच्या मदतीने बॉम्बस्फोटप्रकऱणी असलेल्या आरोपांमुळे अंडा सेलमध्ये असलेल्या कतील सिद्दीकी याचा खून केला होता. पोलिसांनी तत्पुर्वी त्याच्यावर दाखल असलेल्या इतर गुन्ह्यांमुळे त्याच्यावर मोक्काची कारवाई केली होती. सध्या कतील सिद्दीकी खून प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु आहे. त्यातील पाचही साक्षीदार फितूर झाले आहेत.

हा होता प्रकार
टोळीयुद्धातून सॅंडी उर्फ संदिप मोहोळचा खून गणेश मारणे याने केला होता. त्याप्रकरणी त्याला अटक केली होती. तो कारागृहात होता. त्यामुळे त्याच्या टोळीची सुत्रं किशोर मारणे कडे आली होती. त्याचा काटा काढण्यासाठी शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी सापळा रचला. त्या दिवशी किशोर मारणे हा निलायम थिएटरमध्ये नटरंग चित्रपट पाहण्यासाठी आल्यावर चहा पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो प्लॅटीनम हॉटेलमध्ये चहा पित असताना शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदारांनी किशोर मारणेवर हल्ला केला होता.