Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Mohol Murder Case | पुण्यातील गुंड शरद मोहोळ याचा 5 जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. या गुन्ह्यातील आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सध्या येरवडा कारागृहात (Yerawada Jail) न्यायालयीन कोठडीत आहे. मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे (Ganesh Marne) याने वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने गणेश मारणेचा अर्ज फेटाळून लावला आहे. (Pune Crime Court News)

शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याच्या शोधासाठी गुन्हे शाखेने दहा पथके स्थापन केली, परंतु दुसरीकडे मात्र गणेश मारणे याने पोलिसांना चकवा देत वकिलामार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. वकिलांनी मारणेची बाजु मांडताना केलेला युक्तिवाद सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. मोहोळवर गोळ्या झाडणाऱ्यांनी घटनास्थळावर गणेश मारणेचे नाव घेतले होते, त्यामुळे हा गंभीर गुन्हा आहे, जामीन देता येणार नाही असे आदेशात स्पष्ट केले. सरकार पक्ष या प्रकरणात 3 फेब्रुवारी रोजी बाजू मांडणार आहे.

दरम्यान, शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. मोहोळ खुन प्रकरणात गुन्हे शाखेने साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली आहे. तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले असून गणेश मारणे अद्याप फरार आहे. फरार असलेल्या गणेश मारणे याने वकिलांमार्फत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी : मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याने सुरक्षा रक्षकाला चाकूने भोसकले

MP Sanjay Raut | ईव्हीएममध्ये भाजपाने निश्चितच घोटाळा केलाय, खासदार संजय राऊत यांचा आरोप

Rajya Sabha Election 2024 | निवडणुकांचं बिगूल वाजलं, महाराष्ट्रासह १५ राज्यांत राज्यसभेची निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला मतदान

चंदननगर पोलिसांकडून दुचाकी चोरणार्‍याला अटक, 7 वाहने जप्त