Sharad Pawar | शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला; म्हणाले – ‘जरा शहाण्या माणसांबद्दल बोललेलं बरं..’

Chandrakant Patil On Sharad Pawar | 'Sharad Pawar in politics for 50 years, then why he did not decide on Maratha reservation?'; Question by Chandrakant Patil
File photo

कोल्हापूर : पोेलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपविरोधात राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. त्यातच युपीएचे (UPA) नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी करावं अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी शरद पवारांनी भाजप (BJP) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरही निशाणा साधला.

रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, ”आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात राजकीय पक्षांची मोट बांधून त्याचे नेतृत्व करण्यात आपल्याला किंचितही रस नाही. जर अशी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली, तर मात्र आपली त्यास पूर्णपणे मदत राहील; परंतु काँग्रेसला (Congress) वगळून असा सक्षम पर्याय देणे अशक्य असल्याचं ते म्हणाले.”

पुढे ते म्हणाले, ”काही राज्यांत भाजपविरोधात सक्षम पक्ष आहेत; पण देशपातळीवर ते पर्याय देऊ शकत नाहीत. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) शक्तिशाली आहेत; पण त्या पश्चिम बंगाल पुरत्या मर्यादित आहेत. काँग्रेस पक्ष आहे की ज्यांचे प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे जाळे आहे. म्हणूनच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पर्याय देताना काँग्रेसला बरोबर घेऊन तयारी करणे वास्तववादी ठरणार आहे, याचे भान ठेवले पाहिजे.”

केंद्र सरकारच्या कटकारस्थानाला आम्ही भीक घालत नाही..

”केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर यापूर्वी आम्ही कधी पाहिला नाही. 10 वर्षांपूर्वी ‘ED’ शब्दही कोणाला माहीत नव्हता; पण आता ‘ईडी शिवाय चालतच नाही. केवळ कारवाईच नाही, तर आधी ईडी पाठविणार अशी भीती घालायची, कोणी घाबरलाच तर त्याच्याशी सेटलमेंट करण्याच्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या अपेक्षा आहेत. केंद्र सरकारच्या (Central Government) कटकारस्थानाला आम्ही भीक घालत नसल्याचं,” शरद पवार म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना शरद पवारांनी भाजप (BJP) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला.
महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) भाजप सतत टीका करीत आहे. शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे, असेही म्हणतात.
शिवसेनेची यांना एवढी चिंता का ? आम्ही आमच्या भल्याची भूमिका घेऊन काम करीत असताना यांनी आमच्या भल्याची चिंता करू नये.
तर, राष्ट्रवादी पक्ष सतत भूमिका बदलणार पक्ष आहे या चंद्रकांत पाटील यांच्या टिकेकडे लक्ष वेधले असता, ”जरा शहाण्या माणसांबद्दल बोललेलं बरं होईल,” अशा शब्दांत शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

Web Title : Sharad Pawa | ncp sharad pawar on bjp chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharti Singh Good News | सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस बाळाला जन्म..!

 

Retired DySP Dilip Shinde Passes Away | निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे यांचे पुण्यात निधन

 

Neetu Singh Kapoor Viral Dance Video | वयाच्या 63 व्या वर्षी नितू कपूरनं दिली चक्क नोरा फतेहीला टक्कर,
डान्स पाहून तुम्हीही होताल थक्क !

Total
0
Shares
Related Posts