Sharad Pawar | राष्ट्रीय स्तरावरील परिस्थिती पाहता सर्वांनी एकत्र येणं गरजेचं – शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (West Bengal CM) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामधील आजच्या बैठकीची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. राज्याच्या राजकीय वर्तुळासोबतच राष्ट्रीय पातळीवर देखील ही भेट चर्चेत होती. भाजपविरोधी (BJP) आघाडीच्या मुद्यावर ममता बॅनर्जी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बोलले जात होते. अखेर ही शक्यता खरी ठरली आहे. बैठकीनंतर बोलताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रीय स्तरावर जी परिस्थिती आहे ती पाहता सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. देशात एक नवा मजबूत पर्याय उभा करणे अत्यंत आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.

 

ममता बॅनर्जी यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं नातं आहे. हे नातं अधिक सकस होण्यासाठी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या आहेत. आज मी आणि माझ्या सहकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. राष्ट्रीय स्तरावर जी परिस्थिती आहे ती पाहता सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. देशात (country) एक नवा मजबूत पर्याय (new strong alternative) उभा करणे अत्यंत आवश्यक आहे, असे पवार म्हणाले.

 

मी काँग्रेसबाबत बोलत नाही

काँग्रेस (Congress) या नव्या एकत्रिकरणात असेल का असे विचारले असता शरद पवार म्हणाले,
काँग्रेसबाबत मी बोलत नाही, मी म्हणतोय की सर्वांनी एकत्र येण्याची आज गरज आहे.
केंद्रात निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात जे कोणी लढायला तयार आहेत,
अशा सर्वांना एकत्र घतलं जाईल असे पवार यांनी सांगितले. तसेच ममता बॅनर्जी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचंही पवार यांनी सांगितले.

 

Web Title :- Sharad Pawar | a new strong alternative is needed in the country says sharad pawar after meeting with WB CM mamata banerjee

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Harshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ मधल्या ‘मुन्नी’नं शेअर केला व्हिडिओ, करिना कपूरच्या अंदाजामध्ये म्हणाली…

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! स्वच्छतागृहात जायच्या आधी महिलांना लिहावा लागायचा अर्ज; ‘या’ कंपनीतील प्रकाराचा ‘मनसे’कडून ‘पर्दाफाश’

Omicron Variant | ‘नायजेरिया’तून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण; महापालिका प्रशासन अलर्ट