‘या’ कारणामुळे पर्रिकरांनी संरक्षण मंत्रीपद सोडले, शरद पवारांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कॉंग्रेस अध्य़क्ष राहूल गांधी यांच्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत भाजप नेते व मनोहर पर्रिकर यांच्याबाबत खळबळ जनक गौप्यस्फोट केला आहे. मनोहर पर्रिकर यांना राफेल व्यवहार प्रक्रिया मान्य नव्हती त्यामुळे त्यांनी संरक्षण मंत्रीपद सोडले आणि ते गोव्या आले. असे शरद पवार म्हणाले. कोल्हापूर येथे एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार यांनी यावेळी अनेक महत्वाच्या मुद्द्यांना हात घालत नरेंद्र मोदींवर जोरदार टिका केली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींनी आश्वासने पाळली नाहीत. लोकांची नाराजी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत आहेत. देशातील संस्थांवर हल्ला करत ते त्यांचा वापर राजकिय कामासाठी करत आहेत. शिवाय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पत्रकार परिषद घेतात ही बाब चिंतेची आहे. असा आरोप त्यांनी केला. तर सैन्याचा राजकिय फायद्यासाठी वापर कोणत्याही पक्षाने करून नये. परंतु भाजप सैन्याचा वापर केवळ आपल्या फायद्यासाठी करत आहे.

त्यासोबतच शिवसेनेवर टिका करताना ते म्हणाले की बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत जे सातत्य होते. ते आता राहिलेलं नाही. भाजपा सेनेचं सरकार लोकांना नको आहे अशी भावना लोकांच्या मनात आहे. तर राज ठाकरे यांच्या सभांचं त्यांनी कौतुकही केले. राज ठाकरे यांच्या संभांचा फायदा आम्हाला नक्कीच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज ठाककरे सध्या जे चुकीचं चाललं आहे. ते प्रभावीपणे मांडत आहेत. राज ठाकरे आणि आम्ही निवडणूकीत एकत्र नाहीत परंतु राज्य चुकीच्या लोकांच्या हातून काढून घेण्यासाठी सर्वांची मदत घेणार आहोत. असे शरद पवार म्हणाले.

Loading...
You might also like