Sharad Pawar And Brahmin Community | ब्राह्मण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

जबाबदार नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे समाजांमध्ये गैरसमज होणार नाही यासाठी जाणकारांनी एकत्र बसून अशांतता निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar And Brahmin Community | जबाबदार लोकांनी, राजकीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे सजामांमध्ये समज गैरसमज होउन वातावरण कलुषित होत असेल तर जाणकारांनी एकत्र बसून त्यातून मार्ग काढावा. अशा वक्तव्यांमुळे अशांतता निर्माण होणे, हे राज्य आणि देशाच्या दृष्टीने योग्य नाही. ब्राह्मण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ (Parshuram Mahamandal) स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेउन त्यातून चर्चेतून मार्ग काढण्यात येईल, असे ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधींना (Brahmin Community Leaders) आज बैठकीत आश्‍वस्त केल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (Sharad Pawar And Brahmin Community)

 

राज्यातील ब्राह्मण संघटनांच्या प्रतिनिधींची आज मार्केटयार्ड (Market Yard Pune) येथील निसर्ग मंगल (Nisarg Mangal Karyalaya) कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मागील काही महिन्यांत ब्राह्मण समाजाबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यासह काही नेत्यांनी जाहीर केलेल्या वक्तव्यांवरून ब्राह्मण समाज नाराज झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधींच्या मागणीवरून पवार यांनी आज येथे बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते. (Sharad Pawar And Brahmin Community)

 

पवार यांनी सांगितले, की ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्या माध्यमांतून चर्चेसाठी वेळ मागितली होती, त्यानुसार आज ही बैठक झाली. या बैठकीला राज्यातील २० जिल्ह्यातील ८ ते ९ ब्राह्मण संघटनांचे साधारण ४० प्रतिनिधी उपस्थित होते. माझ्या पक्षाच्या सहकार्‍यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी अस्वस्थता असल्याचे सांगितले. आमच्या पक्षात यापुर्वीच यावर चर्चा झाली असून कोणीही कुठल्याही जातीधर्मा बद्दल स्टेटमेंट करू नये, असे मी सांगितले आहे. ज्यांना निरोप मिळायचा आहे, तो त्यांना मिळाला आहे, हे या प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले.

अलिकडच्या काळात ग्रामीण भागातील ब्राह्मण वर्ग शहरात येतो. त्यांना नोकरीत संधी मिळावी यासाठी आरक्षण द्यावे, अशी या प्रतिनिधींची मागणी होती. तसेच अन्य समाजांप्रमाणे ब्राह्मण समाजातील युवकांना व्यवसायासाठी परशुराम महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केली. ब्राह्मण समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाची आरक्षणांचे प्रमाण पाहूनच ते द्यावे लागणार आहे. हे शक्य नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. परशुराम महामंडळ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेउन त्यांच्याशी चर्चा करू असेही या प्रतिनिधींना सांगितले.

 

नवाब मलिकांची केली पाठराखण
राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर कुख्यात डॉन दाउदसोबत (Underworld Don Dawood) संबध असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, हे आरोप आहेत. ते सिद्ध झालेले नाहीत. माझ्यावरही आरोप केले गेले.
माझी खात्री आहे, ज्यावेळी अंतिम निकाल येईल, त्यावेळी ते निर्दोष सुटतील, असा माझा विश्‍वास आहे.
सभागृहातही असे आरोप करणारे विरोधक बाहेर येउन केवळ राजकारण म्हणून आम्हाला असे आरोप करावे लागले
असे सांगतात, असे म्हणत पवार यांनी मलिक यांची पाठराखण केली.

 

पवार म्हणाले….
* महागाई, बेरोजगारी यापासून सर्वसामान्य जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी सामाजिक व धार्मीक तेढ वाढवत आहे.

* प्रत्येक पक्षाला सभा घेण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या सभेला आक्षेप घेण्याचे कारण नाही असे सांगतानाच राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा रद्द होणे, हा काही राष्ट्रीय प्रश्‍न नाही असे उत्तर एका प्रश्‍नावर दिले.

 

Web Title :- Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of ‘Parashuram Mahamandal’ for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock | अदानी समूहाच्या या शेअरने रू. 1 लाखाचे बनवले रू. 61 लाख, तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्टॉक

 

Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

 

MP Udayanraje Bhosale | लाल महाल लावणी प्रकरण ! खा. उदयनराजेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’