शरद पवारांनी केल्या मुख्यमंत्र्यांकडे ‘या’ १० मागण्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात फिरून दुष्काळाची पाहणी केली. राज्यातील दुष्काळाचा आढावा घेऊन शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी राज्यातील दुष्काळाबाबतच्या उपाययोजनांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. शरद पवार यांना दुष्काळ दौऱ्यादरम्यान लोकांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीला शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, राणा जगजीतसिंह पाटील, दीपक साळुंखे उपस्थित होते.

शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या झालेल्या बैठकीदरम्यान चारा छावण्या, फळबाग, दुष्काळी भागातील नागरिकांना काम, योग्य पाण्याचे नियोजन, अन्नधान्याचे नियोजन, जायकवाडी धरणातील पाणी प्रश्न या प्रमुख विषयांवर चर्चा केली. तसेच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रामुख्याने दहा मागण्या केल्या आहेत.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्य मागण्या

१) फक्त उस चारा म्हणून न देता इतर चाराही द्यावा
२) दुष्काळग्रस्त भागातील चारा छावण्या उशिरा देण्यात आल्या. चारा अनुदान ९० रुपयांवरून ११० रुपये करावे.
३) फळबागा जळून चालल्या आहेत. फळबाग जळणे म्हणजे २५ वर्षांचं नुकसान आहे.
४) आमचे सरकार असताना ३५ हजार रुपये प्रति हेक्टरी दिले होते ते द्यावेत.
५) २०११ च्या जनगणनेनुसार पाणी दिले जाते त्यात बदल करावा.
६) दुष्काळग्रस्त भागात पाणी वाटपात घोटाळा होतो ते रोखावे.
७) छावण्या सुरू झाल्या पण ज्या संस्था छावण्या चालवतात त्यांना पैसे दिले गेले नाही.
८) एका दिवसाचा संस्थांचा खर्च 1 लाख आहे महिनाभर छावण्या कशा चालवणार?
९) विम्याचे पैसे मिळाले नाहीत. फळबाग योजना विमा का मिळाली नाही?
१०) जायकवाडी धरणाचे पाणी मराठवाड्याला सध्या देण्यात यावे. नाहीतर बाष्पीभवन होऊन ते पाणी वाया जाईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like