sharad pawar and prashant kishor । पवारांसोबतच्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली?; रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसापूर्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (prashant kishor) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात एक भेट झाली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. यानंतर सोमवारी (21 जून) रोजी प्रशांत किशोर (prashant kishor) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली.

घरपट्टी आणि असेसमेंट उतारा’ देण्यासाठी चक्क मागितली ‘लाखा’ची ‘लाच’; ग्रामविकास अधिकार्‍यासह कर्मचार्‍याला पकडले ‘रंगेहाथ’

यानंतर प्रशांत किशोर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. सध्या सत्तेत असणाऱ्यांना तिसरी अथवा चौथी आघाडी काही आव्हान निर्माण करु शकते असे मला वाटत नाही, असं मत प्रशांत किशोर  यांनी व्यक्त केलं. तसेच, सोमवारी झालेल्या बैठकीदरम्यान काय चर्चा झाली याची माहिती त्यांनी दिली आहे.

sharad pawar and prashant kishor | Do not believe that the third and fourth fronts can challenge BJP’s Prashant Kishor

– काय म्हणाले प्रशांत किशोर?

प्रशांत किशोर म्हणाले, सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये तिसरी आघाडी हा प्रयोग फारसा प्रभावी ठरणार नाही, असं त्यांनी म्हटलं. किशोर यांनी सोमवारी शरद पवार यांची घेतलेली भेट ही तिसऱ्या आघाडीच्या उभारणीसाठी होती ही शक्यता निकाली निघाली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

दरम्यान, तिसऱ्या आघाडीबद्दल चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो नव्हतो असंही किशोर म्हटलं आहे. ‘या बैठकींमधून आम्ही दोघे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. याआधी आम्ही कधीही एकत्र काम केलेलं नाही. त्यामुळेच या बैठकींमधून आम्ही एकमेकांचे विचार जाणून घेत असल्याचे संकेत प्रशांत किशोर यांनी दिले आहेत.

Builder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

‘या’ विषयावर चर्चा –

भाजपाविरोधात लढताना आम्ही वेगवेगळ्या राज्यांमधील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. भाजपाला टक्कर देताना कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या गोष्टी काम करु शकतात आणि कोणत्या नाही यावर आमची चर्चा झाली. सध्या आम्ही तिसऱ्या आघाडीचा विचार करत नाही असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं आहे.

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

काँग्रेसबद्दल प्रशांत किशोर म्हणाले..

काही दिवसापूर्वी झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर सक्रीय राजकारणाशीसंबंधित क्षेत्रातून माघार घेण्याची भाषा करणाऱ्या निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या  भूमिकेवर म्हणाले. पक्षामध्ये अंतर्गत गोंधळ आहे हे मान्य करुन त्यावर उपाय शोधणे काँग्रेसला आवश्यक आहे. अशी टीका त्यांनी केलीय.

पेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार गाड्या, 60-62 रुपये असेल एक लीटरची किंमत

दिल्लीत आज महत्वाची बैठक –

आज (22 जून) दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. देशातील विद्यमान राजकीय परिस्थिती, जनतेला भेडसावणारे प्रश्न आणि केंद्र सरकारची वादग्रस्त धोरणे या मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा केली जाणार असली तरी, संभाव्य बिगरभाजप महाआघाडीच्या पर्यायाची चाचपणी हाच बैठकीचा प्रमुख हेतू असल्याचे मानले जात आहे.

Pune News | मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल करणार्‍यास घेतले पुण्यातून ताब्यात

तसेच, या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री व मोदींचे विरोधक मानले जाणाऱ्या यशवंत सिन्हा  यांच्या ‘राष्ट्र मंच’ या बिगरराजकीय संस्थेने ही बैठक आयोजित केली आहे. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आदी 15 विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

राजकीय स्थितीवरही चर्चा –

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाचे उपाध्यक्ष बनलेले यशवंत सिन्हा यांनी भाजपविरोधी राजकीय आघाडीबाबत बोलण्यास नकार दिला.
परंतु, देशातील राजकीय स्थितीवर बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचं सिन्हा यांनी म्हटलं आहे.

Earn Money | 1 रुपयाची नोट तुम्हाला बनवेल ‘मालामाल’, मिळतील पूर्ण एक लाख रुपये; जाणून घ्या कसे

‘राष्ट्र मंच’ हे बिगरराजकीय व्यासपीठ असल्याने बैठकीला विरोधी पक्षनेत्यांसह बिगर राजकीय प्रतिनिधीही उपस्थित असतील.
देशातील विविध मुद्दय़ांप्रमाणे राजकीय स्थितीवरही चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.

Bank Privatisation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, देशातील ‘या’ 2 मोठ्या बँकाचेही होणार खासगीकरण, कर्मचारी अन् ग्राहकांत संभ्रम

चर्चेला मिळालं बळ –

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेससाठी किशोर यांच्या ‘आय-पॅक’ कंपनीने यशस्वी निवडणूक रणनीती आखली होती.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभूत केल्यानंतर,
केंद्रातील मोदी सरकारविरोधात बिगरभाजप-बिगर काँग्रेस पक्षांची आघाडी स्थापन करण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली असून,
दिल्लीतील पवार-किशोर यांच्या भेटीने या चर्चेला बळ मिळाले आहे.

शिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार

आजची बैठक महत्वाची –

आगामी 2024 मधील लोकसभा निवडणुक तसेच, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपविरोधात एकत्रितपणे लढण्याची रणनीती आखली जाऊ शकते. म्हणून या बैठकीला एक वेगळं वळण लागलं आहे.

पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात योगा हा नवा अभ्यासक्रम सुरु

काँग्रेस पक्षाच्या सहभागाविना?

काँग्रेसच्या ‘जी-23’ गटातील नेते कपिल सिबल यांनाही या बैठकीचे निमंत्रण असले तरी आपण उपस्थित राहणार नसल्याचे सिबल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या बैठकीत काँग्रेसचे  प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

दरम्यान ही बैठक बिगरभाजप आघाडीच्या शक्याशक्यतेवर चर्चा करण्यासाठी होत असली तरी, काँग्रेसला वगळून भाजपविरोधी आघाडी तयार करण्यासंदर्भात शरद पवार आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांनी कोणतेही विधान केले नाही.

Web Titel : sharad pawar and prashant kishor | Do not believe that the third and fourth fronts can challenge BJP’s Prashant Kishor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update