Sharad Pawar | भाजपने निवडणुकीत माघार घेतली, अशी शंका घेणे योग्य नाही – शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरीच्या पोटनिवडणुकीवरुन (Andheri By-Election) भाजप-शिंदे सेना विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने आले होते. पण आता भाजपने (BJP) या निवडणुकीच्या रिंगणात हत्यारेच टाकल्याने संग्राम टळला आहे. भाजपने ही निवडणूक बनविरोध करावी, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आवाहन केले होते. आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपच्या भूमिकेवर भाष्य केले आहे.

 

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल याची मला खात्री होती. अखेर आज भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. याचा मला आनंद आहे. आता एकदा त्यांनी माघार घेतली आहे, त्यामुळे त्यावर शंका किंवा इतर काही बोलणे योग्य नाही, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन ट्वीट केले आहे.

मुळात ही पोटनिवडणूक आहे. रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाले त्यामुळे ही निवडणूक होत आहे.
त्यांच्या पत्नीला जागा मिळणार अशी शक्यता होती. आधी निर्णय घेतला असता, तर फायदा झाला असता का, या गोष्टीची चर्चा करण्यात अर्थ नाही.
निर्णय कधी झाला, केव्हा झाला आणि कसा झाला, यापेक्षा तो झाला, हे महत्वाचे, असे शरद पवार म्हणाले.

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांकडून आणि खुद्द शरद पवार
यांच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडून भाजपला डिवचले जात आहे.
भाजपला निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत होता त्यामुळे त्यांनी माघार घेतली आहे.
राज ठाकरे यांचे पत्र हे देखील स्क्रिप्टचा भाग आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते.

 

Web Title :- Sharad Pawar | andheri bypoll 2022 bjp has withdrawn from by election it is not right to doubt now sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | भाजपच्या माघारीनंतर शरद पवार पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर बोलले, म्हणाले- ‘माझी भाजपकडे मागणी नव्हती, तर…’

Chandrakant Patil | ‘आम्ही माघार घेतली नसती, तर…’, चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना सुनावलं

Devendra Fadnavis | ‘काहींनी प्रत्यक्ष विनंती केली, तर काहींनी…’, विरोधकांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर