पत्रकार परिषदेत ‘त्या’ प्रश्नावरून भडकले शरद पवार

श्रीरामपूर (नगर) : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे फारसे सार्वजनीक कार्यक्रमात चिडताना दिसत नाहीत किंवा कोणावर रागावताना दिसत नाहीत. आपल्या संयमी स्वभावामुळे त्यांची वेगळीच ओळख आहे. मात्र, आज श्रीरामपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नावर ते चांगलेच भडकले. एवढेच नाही तर त्यांनी पत्रकाराला त्या प्रश्नाबद्दल माफी मागण्यास सांगितले. राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडून जात आहेत. तुमचे नातेवाईक असलेले नेतेही पक्ष सोडत आहेत या प्रश्नावरून शरद पवार पत्रकारावर भडकले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे श्रीरामपूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादीचे नेते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्यांना राष्ट्रवादीच्या गळती विषयी पत्रकारांकडून विचारणा केली जाते. अशीच विचारणा शरद पवार यांना आज करण्यात आली. तुमच्या जवळचे नेते पक्ष सोडून जात आहेत, तसेच तुमचे नातेवाईक असलेले नेते पक्ष सोडत आहेत असा प्रश्न विचारताच शरद पवार याचा पारा चढला. आपल्या जागेवरून उठत त्यांनी नातेवाईकाचा विषय का काढता असा सवाल पत्रकारांना केला.

नातेवाईकांचा प्रश्न शरद पवार यांना आवडला नाही. त्यामुळे त्यांचा पारा चढला. इथे नात्याचा तुम्ही प्रश्न का विचारला असा प्रश्न करत त्यांनी माफी मागा अशी मागणी केली. इथे नात्याचा प्रश्नच येत नाही. हा तुमचा प्रश्न औचित्याचा भंग करणारा आहे. मी पत्रकार परिषद सोडून जातो असं ते म्हणाले. त्यावेळी उपस्थितांनी त्यांना बसण्याची विनंती केली. तसेच पुन्हा अशा पत्रकारांना बोलवू नका नाहीतर मला तरी बोलवू नका असे सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –