सुप्रिया माझी देखील ‘मुलगी’, असं सांगितलं होतं बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सध्या सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील समन्वय काल सर्वांसमोर होता. बाळासाहेब ठाकरे हयात असताना देखील शिवसेना आणि शरद पवार यांचे चांगले संबंध होते. काँग्रेस विरोधी असूनही अनेकदा शिवसेनेने चांगला विचार करत काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थन देखील केलं होत. सध्या राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस असे त्रिकुट मिळून राज्यात सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत आहेत.

पवारांची आत्मकथा असलेल्या ‘ऑन माय टर्म्स’ मध्ये ते म्हणतात
बाळासाहेब ठाकरे अनेकदा शरद पवारांचा मैद्याच पोत म्हणून उल्लेख करायचे, परंतु रात्री कुटुंबासह जेवणालाही घरी बोलवायचे. शरद पवार आपल्या ऑन माय टर्म्स या आत्मकथेत म्हणतात, बाळासाहेबांचा नियम होता की त्यांनी जर एखाद्याला मित्र म्हंटले तर ते तो शब्द कायम निभवायचे. पवार म्हणतात 2006 मध्ये जेव्हा माझी मुलगी सुप्रिया राज्यसभेसाठी उभी होती त्यावेळी मला बाळासाहेबांचा फोन आला आणि ते म्हणाले, शरद बाबू मी हे काय ऐकतोय, आपली सुप्रिया निवडणूक लढवतीय, अहो मी लहान असल्या[पासून तीला पाहतोय ती मला मुलीसारखीच आहे. परंतु ही गोष्ट मला बाहेरच्यांकडून समजतीय त्यावर पवार म्हणाले तुमच्या युतीने उमेवाराची घोषणा देखील केली आहे म्हणून काही बोललो नाही. त्यावर बाळासाहेब लगेच म्हणाले शिवसेना सुप्रिया विरोधात उमेदवार देणार नाही त्यावर पवारांनी विचारले आणि तुमचा मित्र पक्ष त्यावर क्षणाचाही विलंब न लावता बाळासाहेब उत्तरले तुम्ही कमळीची काळजी करू नका ते मी पाहतो.

काँग्रेसला दिला होता शिवसेनेने पाठींबा
2007 मधील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस उमेदवार असलेल्या प्रतिभा पाटील याना पाठींबा दिला होता. 2012 मध्ये सुद्धा शिवसेनेने प्रणव मुखर्जी यांना पाठींबा दिला होता. सर्व देश ज्यावेळी इंदिरा गांधी यांच्या विरोधात होता त्यावेळी बाळासाहेबांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीला पाठींबा दर्शवला होता. त्यावेळी असे देखील बोलले जात होते की मुंबईतून कम्युनिस्ट वर्गाला संपवण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसकडून खत पाणी घातले जात होते. म्हणूनच त्यावेळी शिवसेनेला वसंत सेना असे देखील म्हंटले जात होते.

Visit : Policenama.com