अजित पवार, सुप्रीया सुळे नाही तर ‘हे’ आहेत शरद पवारांचे राजकीय ‘वारसदार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय वारसदाराची घोषणा केली आहे. प्रत्येक वेळी शरद पवार यांना तुमचा राजकीय वारसदार कोण ? अशी विचारणा केली जाते. मात्र, आता शरद पवार यांनी आपल्या राजकीय वारसदाराबद्दल सांगितले आहे. शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या राजकीय वारसदाराबद्दल सांगितले आहे. शरद पवार यांचा राजकीय वारसदार हे तिसऱ्या पिढीतील रोहित पवार किंवा पार्थ पवार यांच्यापैकी एक आहेत.

शरद पवार यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. रोहित पवार आणि पार्थ पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तर रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. तर रोहित पवार हे विधानसभेच्या माध्यमातून आपले नशीब अजमावत आहेत.

शरद पवार यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाल्याने शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण होणार याची चर्चा सुरु झाली होती. सुप्रीया सुळे आणि अजित पवार हेच शरद पवार यांचे राजकीय वारसदार असतील अशी चर्चा होती. मात्र, आपल्या राजकीय वारसदाराबद्दल शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. पवार घराण्याचा पुढचा वारसदार कोण हे जनताच ठरवेल असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे. पार्थ आणि रोहित यांच्यापैकी पवार घराण्याचा पुढचा वारसदार कोण अशी विचारणा केली. त्यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, ज्याला लोकांचा पाठिंबा मिळेल आणि लोक ज्याला पुढे आणतील तोच वारसदार ठरेल अस सांगत जनतेच्या कोर्टात हा चेंडू टाकला आहे.

Visit : Policenama.com