मी माढामधून लढणार नाही : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मी माढा मतदार संघातून लढावं अशी पक्षातील लोकांचा आग्रह होता. परंतु एकाच कुटुंबातील जास्त उमेदवार नको म्हणून मी माघार घेत आहे. त्यासोबतच नव्या पीढीला संधी द्यावी हा हेतू आमचा आहे. त्यामुळे मावळमधून पार्थ पवारला उमेदवारी द्यावी असा आग्रह पक्षातून करण्यात आला आहे. असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहिर केले. पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

मी काही भितीने माघार घेत नाही. मी चौदा निवडणूका लढलो आहे. आतापर्यंत मी हरलो नाही. पंधराव्या निवडणूकीत मला घाबरण्याची काहीच गरज नाही. एकाच कुटुंबातील जास्त उमेदवार नको म्हणून मी माढामधून माघार घेत आहेत. तर मी स्वत निवडणूकीला उभं न राहता नव्या पिढीच्या उमेदवारांना काम करणाऱ्यांना संधी देण्याचे ठरले आहे. माझा नातू पार्थ पवारला मावळमधून उमेदवारी द्यावी असा आग्रह शेकापचे जयंत पाटील यांनी केला. पक्षातून तरुण पिढीला संधी द्यावी असा आग्रह आहे. त्यामुळे पार्थ पवारला उमेदवारी देण्याचे ठरले आहे. असे पवार म्हणाले.

त्यासोबतच पुण्यातील लोकसभेच्या जागांबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. पुण्यात आमचे नगरसेवक कॉंग्रेसपेक्षा जास्त आहेत. परंतु पुण्यातील चार जागांपैकी तीन जागा राष्ट्रवादी लढवते. त्यामुळे चारही जागा मागणे ही कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी चांगली बाब नाही.

तर नगरमधून सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीबाबत त्यांनी उत्तर दिले की, नगरमध्ये दोन क्रमांकाची मतं राष्ट्रवादी कॉंग्रेसला आहेत. त्यामुळे नगरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच उमेदवार उभे राहतील. सुजय विखेंना उमेदवारी मिळू शकत नाही. तसेच सुजय विखे पाटील भाजपमध्ये जाण्याने आघाडीवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. असे ते म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीसोबतच्या चर्चेला मी नव्हतो. माझ्या पक्षातील नेते उपस्थित होते. तर मी स्वाभीमानीच्या बैठकीला उपस्थित होतो. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. शेट्टींसाठी जागा सोडणार आहोत.

 

You might also like