शरद पवार ‘बडे खिलाडी’, PM मोदींचा ‘खोचक’ टोला

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट आहे. जे लोक साताऱ्याला बालेकिल्ला समजत होते, ते लोकही लढायची आता हिंमत करत नाहीत. राष्ट्रवादीने पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सुद्धा लढायला तयार झाले नाहीत. शरद पवार हे शरद पवार आहेत, ते हवेची दिशा बरोबर ओळखतात, ते बडे खिलाडी आहेत, असा खोचक टोला लगावला.

सातारा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सभा झाली. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. मोदी पुढे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शहिदांवर जेव्हा प्रश्न उपस्थित करतात तेव्हा सर्वात जास्त दु:ख साताऱ्यातील भूमीला होतं. सावरकरांना हे लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा राग अनावर होतो. हे दोन्ही पक्ष कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर शिवसेना-भाजप महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न करत आहे.

मागील पाच वर्षात महायुतीच्या सरकारने शिवाजी महाराजांच्या संस्कारांनी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रसंरक्षण आणि राष्ट्रवादाला आम्ही प्राथमिकता देतो. भारतावर जो वाईट नजर ठेवेल त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. शिवाजी महाराजांनी त्या काळात सशक्त सेना निर्माण केली होती. मागील पाच वर्षात आमच्या सरकारने भारतीय सेनेला जगातील ताकतवान सेनेच्या पंक्तीत आणून बसवलं आहे. जे आमच्या विरोधात उभे आहेत त्यांनी राष्ट्ररक्षेसाठी आम्ही उचलेल्या पावलांचा विरोध केल्याची टीका विरोधकांवर केली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी