Sharad Pawar | कट्टर आणि निष्ठावान ज्येष्ठ नेत्याचा राष्ट्रवादीला राम राम, लवकरच करणार शिंदे गटात प्रवेश

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना (Shivsena) फुटीनंतर आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात देखील फूट पडणार असल्याची चर्चा होती. त्याप्रकारचे भाष्य भाजपच्या (BJP) अनेक आमदारांनी केले आहे. त्यामुळे शरद पवारांना (Sharad Pawar) विद्रोहाला सामोरे जावे लागणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, सोलापूरमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे (Dilip Kolher) शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडणार असल्याचे बोलले जात आहे.

 

शिवसेनेच्या ठाकरे गटातील (Shiv Sena Thackeray Group) 40 आमदार, 12 खासदार आणि असंख्य पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shiv Sena) पक्षात म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार देखील उत्सुक असल्याचे दिसते. राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत मानलेले कोल्हे राष्ट्रवादीला राम राम म्हणणार आहेत. त्यांनी लवकरच आपले बस्तान शिंदे यांच्या पक्षात हलविण्याचे ठरविले आहे.

 

शिंदे यांच्या सरकारमधील मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची कोल्हेंनी भेट घेतली.
त्यांनी दिवाळी सणानंतर शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहर निरीक्षक शेखर माने (Shekhar Mane) यांनी दिलीप कोल्हेंना फोन करुन त्यांची मनधरणी केली आहे.
त्यावेळी कोल्हे यांनी मी का जातोय, याचा विचार करा, चिंतन करा, असे मानेंना सांगितले.

आत्मचिंतन करा आमि मगच माझ्याशी बोला, असे कोल्हेंनी सांगितल्याने ते राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांपूर्वी कोल्हेंनी सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले (Haribhau Chougule) यांच्या कार्यलयात रात्री भेट घेतली होती.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर कोल्हे कायम टीका करत होते. सोलापूरात महेश कोठे (Mahesh Kothe)
समर्थक नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या गोटात प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली होती.
आता दिलीप कोल्हे यांनी आपला मोर्चो शिंदे गटाकडे वळवला आहे.

 

 

Web Title :- Sharad Pawar | big setback to ncp sharad pawar a staunch supporter
loyalist dilip kolhe likely to left the party and join shinde group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा