Sharad Pawar | ‘…त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम होतेय’ – शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू आहे. अनेक कारणाने परस्पर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. महाविकास आघाडी सरकारच्या काही मंत्र्यावर कारवाईचे सत्र सुरू आहे. तर काही मंत्री ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आहेत. अशा सर्व प्रकारावरुन राष्ट्रवादी काॅग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) निशाणा साधला आहे.

 

त्यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, ‘महाराष्ट्रासारखं राज्य भाजपच्या हातातून गेल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर मोठा परिणाम झाला असून, त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता असल्याचं यावेळी शरद पवार यांनी म्हटलंय. तर, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून, विरोधीपक्ष रोज सरकार पडणार असल्याचं सांगत होतं. परंतु, तसं झालं नसून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला. मात्र, सरकार पडत नसल्याने ते अस्वस्थ झाले असून, दुसऱ्या मार्गाने राज्याला अडचणीत आणण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यामुळे नेत्यांच्या चौकशा लावणे, सरकारला अडचणीत आणणे अशा लोकशाही विरोधी मार्गांचा ते अवलंब करत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

 

पुढे शरद पवार म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) वेगवेगळ्या नेत्यांवर चौकशा लावल्या जात आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील लोकांवर खोटे आरोप केले जाता आहेत,
तसं या तीन्ही पक्षांचं नातं घट्ट होतं आहे, असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- sharad pawar | bjp is unhappy with the absence of government in maharashtra so ed is using cbi sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा