शरद पवार कोकण दौरा ‘अर्धवट’ सोडून मुंबईला रवाना, राजकीय घडामोडींना ‘वेग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील जनतेने आपल्याला विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिलाय आणि त्याचा सन्मान राखणार असे शरद पवारांनी स्पष्ट केले होते. चार दिवासांपूर्वी शेतकरी संवाद दौऱ्यावर असलेले शरद पवार दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईत परतले आहे. कराडचा कार्यक्रम उरकून पवार थेट मुंबईला रवाना झाले. राज्यात भाजप शिवसेनेचा वाद चांगलाच पेटला आहे, नवं सरकार स्थापन होण्यास काहीच कालावधी शिल्लक असताना पवार दौरा मध्येच सोडून मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय हलचालींना वेग आला आहे.

शरद पवारांनी मुंबईत पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. भाजपा-शिवसेना या दोघांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे. जनतेने काँग्रेस आघाडीला विरोधी बाकावर बसण्याची संधी दिली आहे. त्यामुळे समर्थपणे ही जबाबदारी पार पाडण्याची आमची भूमिका आहे असे पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यानंतर पवार आपल्या चार दिवसांच्या नियोजित दौऱ्यावर निघाले होते.

शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान केले आहे. यावेळी दौऱ्यावर असलेल्या पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पवार आज साताऱ्यातील कराड येथे एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर कोकणात जाण्याचा दौरा होता, मात्र दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. पुण्यात थोडावेळ थांबून आज रात्री ते मुंबईला परततील असे सांगण्यात येत आहे.

पवार दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतत असताना तर्कवितर्क लावले जात आहे. विधानसभेची मर्यादा शुक्रवारी रात्री 12 वाजता संपेल. त्यानंतर कोंडी करण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात होईल, त्यामुळे सर्व पक्ष सावध पवित्रा म्हणून आपल्या आमदारांना मुंबईत बोलावून घेत आहेत. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास नवी सत्ता समीकरणं जुळू शकतात. त्यामुळे शरद पवारांनी मुंबईतील उपस्थिती महत्वाची आहे असे सांगण्यात येत आहे.

पक्षीय बलाबल –

भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी काँग्रेस- 54
काँग्रेस- 44
बहुजन विकास आघाडी- 3
समाजवादी पार्टी- 2
एमआयएम- 2
प्रहार जनशक्ती पार्टी- 2
माकप- 1
महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 1
जनसुराज्य शक्ती- 1
क्रांतिकारी शेतकरी पार्टी- 1
स्वाभिमानी पक्ष- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- 1
शेकाप – 1
अपक्ष- 13
एकूण जागा- 288

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके