Sharad Pawar | पवार साहेब मोठं व्यक्तीमत्व, ते भीष्म पितामह आहेत; शिंदे गटाच्या मंत्र्याकडून शरद पवारांचे कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई क्रिकेट संघटनेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीला (Mumbai Cricket Association Elections) मोठी कलाटणी मिळाली आहे. आज निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना या निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता असलेले शरद पवार (Sharad Pawar) गट आणि आशिष शेलार (Ashish Shelar) गट यांनी युती करत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आज शरद पवार (Sharad Pawar) आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा झाल्यानंतर एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

 

शरद पवार (Sharad Pawar) आणि आशिष शेलार यांचे गट एकत्र आल्याने आता निवडणुकीमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार असा संयुक्त गट असेल. तसेच ऐनवेळी हे दोन्ही गट एकत्र आल्याने आता शरद पवार गटातील उमेदवार संदीप पाटील (Sandeep Patil) यांच्यासह इतर उमेदवारांचं भवितव्य काय असेल, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, निवडणूक लढवत असलेल्या शरद पवार यांच्या गटामध्ये मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांचा समावेश आहे.

 

शरद पवार भीष्म पितामह

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीमध्ये शरद पवारांच्या पॅनलमधून मुंबई भाजपचे अध्यक्ष (Mumbai BJP President) आशिष शेलार अध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत,
यावर शिंदे गटाचे (Shinde Group) मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर (Spokesperson Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पवार साहेब हे फार मोठं व्यक्तीमत्व आहे. खेळामध्ये त्यांचं फार मोठं स्थान आहे.
पवार साहेबांनी खेळात कधी राजकारण आणलं नाही.
ते स्पर्ट्समधले भीष्म पितामह (Bhishma Pitamaha) आहेत,
अशा शब्दात केसरकर यांनी शरद पवारांचे कौतुक केले.

 

Web Title :- Sharad Pawar | cm eknath shinde camp minister deepak kesarkar called sharad pawar bhishma pitamaha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा