एकदा घरोबा केला की सारखंसारखं कुंकू बदलायंच नसत, शरद पवारांचा जयदत्त क्षीरसागरांना ‘टोला’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – घरोबा एकदाच करावा लागतो. सारखं सारखं असं कुंकू बदलायंच नसतं त्यांच्यासोबतच प्रामाणिक रहायचं असतं, घरोबा करू जर प्रामाणिकपणा सोडला तर त्याला लोक काय म्हणतात मी सांगत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. बीड विधानसभा मतदारसंघामध्ये काकाविरुद्ध पुतण्या यांच्यात काट्याची लढत होत आहे. शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसगार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संदीप क्षीरसागर या काका पुतण्यामध्ये लढत होत आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद एक वेळा नाही तर तीन वेळा दिले. ज्या मधून बीडचा विकास अपेक्षित होता. स्व. केशर काकून हयातीमध्ये कधीच साथ सोडली नाही. त्या प्रमाणिक राहिल्या त्यांचा आज सन्मान होतो. मात्र, दुसऱ्या पिढीला काकू पेक्षा जास्त सगळ मिळालं. त्यांनी सत्ता, पद दिले असताना गुदमरल्याने होतं म्हणून तिकडच्या घरी गेलो. तीन वेळा मंत्री होऊन गुदमरत का ? असा प्रश्न उपस्थित करत सारखं सारखं कुंकू बदलायचं नसतं, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

जयदत्त क्षीरसागर यांचा खरपूस समाचार घेताना शरद पवार म्हणाले, ज्यांच्यासाठी साथ दिली त्यांनी भलत्या घरात प्रवेश केला. या वयात घर बदलायची सवय असेल तर त्यांना जागा दाखवा आणि त्यांची जागा तुम्ही घ्या. सत्तेत असताना अनेकांना शक्ती दिली पण त्यांनी स्वत: चे कल्याण करून दुष्काळी जिल्ह्यासाठी सत्तेच्या खर्चाचा लाभ लोकांना मिळावा, यासाठी व्हायला होता. मात्र, तो झाला नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी