राफेलची किंमत जाहीर करण्याची शरद पवारांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राफेलचे तंत्रज्ञान देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. या विमानांच्या किंमतीबाबत मला काही बोलता येणार नाही. मात्र काँग्रेस आणि इतर पक्ष जर राफेलच्या किंमतीची माहिती मागत असतील, तर ही माहिती देण्यास सरकारला हरकत नसावी, असे मत माजी संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e2edff16-c151-11e8-9f18-1337e51e968f’]

दिवंगत हिंद केसरी गणपत आंदळकर यांच्या श्रद्धांजली सभेला शरद पवार उपस्थित होते. या श्रद्धांजली सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार म्हणाले, राफेल करार गोपनीय असल्याचे सरकार सांगत आहे. मी संरक्षण मंत्री म्हणून काम केले आहे. गोपनीयता ही तंत्रज्ञानाबाबत असते, या विमानांची किंमत हा तंत्रज्ञानाचा भाग नाही. त्यामुळे तंत्रज्ञान तसेच इतर गोपनीय माहिती सोडून किंमतीची माहिती द्यायला सरकारला हरकत नाही. सरकारमधील जे लोक गोपनीय माहिती देता येणार नाही असे सांगत आहेत, तेच लोक बोफोर्स प्रकरणावेळी तंत्रज्ञानासह सर्व माहिती मिळावी, याबाबत आग्रही होते. यामध्ये सुषमा स्वराजदेखील होत्या.

न्या. गोगोई यांना सरन्यायाधीश करण्याच्या विरोधात वकिलाची सुप्रीम कोर्टात याचिका

त्यावेळी सभागृहदेखील काही दिवस बंद ठेवावे लागले होते. त्यावेळी या लोकांना सर्व माहिती हवी होती, मग आज राफेलची माहिती द्यायला यांना काय हरकत आहे. मी सर्व माहिती मागत नाही, फक्त किंमतीची माहिती मागत आहे, असे शरद पवार म्हणाले.

[amazon_link asins=’B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f89890fb-c151-11e8-ab6d-af9ca07ba35d’]