देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही स्ट्रॅटेजीस् तयार केल्या, तरी 2024 लाही मोदीच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात आणि राज्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar) यांनी भाजपविरोधी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर ( Political strategist Prashant Kishor ) आणि शरद पवार यांची मुुबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चर्चा झाली. महाराष्ट्र अन् केंद्रात भाजपला दूर ठेवायचे, त्याच वेळी देशपातळीवर पंतप्रधान मोदींना सक्षम पर्याय कसा द्यायचा यावर बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान या भेटीनंतर भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी कोणाची भेट घ्यावी, यावर कुठलही बंधन नाही. विरोधी पक्षाचे लोक असू द्या, किंवा सत्ताधारी पक्षाचे नेते असू द्या. प्रत्येकजण आप-आपली स्ट्रॅटेजी तयार करतात. कोणी कितीही स्ट्रॅटेजीस् तयार केल्या तरी आजही मोदीच आहेत अन् 2024 च्या निवडणुकांतही मोदींच्या नेतृत्वातच भाजपचे सरकार येईल, असा विश्वास फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडे तीन तास चर्चा
शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी प्रशांत किशोर आज सकाळी पोहचले. त्यानंतर किशोर यांनी पवारांसोबत जेवणही केले. या दोन्ही नेत्यात तब्बल साडे तीन तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही (NCP state president Jayant Patil ) उपस्थित राहिले. ही भेट संपल्यानंतर शरद पवार आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्यासह पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,697 नवीन रुग्ण, तर 14,910 जणांना डिस्चार्ज

पवार- किशोर भेटीच सेनेकडून स्वागत
बाळासाहेब ठाकरे यांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता.
त्यामुळे शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल असे शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत ( Shiv Sena leader MP Arvind Sawant ) यांनी म्हटले आहे.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीचं स्वागतच आहे. देशात एककल्ली कारभार सुरू आहे.
देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय आवश्यक आहे.
काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपच फावल आहे. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत.
शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी आहे.
त्यामुळे शरद पवारांनीही तो विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी शिवसेनेचे कौतुक केल्याचे सावंत म्हणाले.

या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमागे कोणतेही राजकीय गणिते नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी केला आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी हा दावा केला आहे.
स्वतः प्रशांत किशोर यांनीच हे जाहीर केले आहे की ते आता राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणार नाहीत.
त्यामुळे राजकारण करण्याचा संबंध येत नाही. पवार साहेब अनेकांना

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : sharad pawar devendra fadnavis says prashant kishors visit still

हे देखील वाचा

Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली, असे संभाजीराजे समजतात, पण…’

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरात आज 442 जण ‘कोरोना’मुक्त, 240 नवीन रुग्णांची नोंद

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा