Sharad Pawar | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला फायदा होईल अशी कृती नको

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sharad Pawar | राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळण्यास सुरुवात झाली आहे. आरोप- प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरूच आहेतच. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार असल्याने पक्षांच्या बैठकांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. बैठकीत पवार यांनी मंत्र्यांच्या कामाचा आणि त्यांच्या विभागाचा आढावा घेतला. महत्त्वाचे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी फायदा होईल त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आघाडी करा; मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजपला फायदा होईल, तिथे आघाड्या करू नका अशा स्पष्ट सूचना शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता काही दिवसापासून राष्ट्रवादी किंवा शिवसेना दोन्हीपैकी एक पक्ष भाजपसोबत जाईल का ? अशी जी चर्चा सुरु होती. तिला पूर्णविराम मिळाला आहे.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय करण्याला ठाम विरोध केला पाहिजे. ओबीसींचे आरक्षण दिल्यानंतरच निवडणुका घेण्यावर ठाम राहिले पाहिजे. या निवडणुकीत भाजपला फायदा होईल अशी कृती आपल्याकडून होऊ नये, यासाठी बारकाईने नियोजन करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या. प्रत्येक नेत्याकडे एका जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येईल. त्यांनीच त्या जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही, याबाबत निर्णय घ्यावेत. परंतु निर्णय घेण्यापूर्वी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करावी. दरम्यान, स्थानिक पातळीवर नेमकी काय परिस्थिती आहे याचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा. विनाकारण सत्ताधारी पक्षांमध्ये कटुता निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करू नका, असे स्पष्ट आदेशही पवार यांनी दिले.

ईडीच्या कारवाया हा भाजपचा कट

बैठकीविषयी माहिती देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले,
बैठीमध्ये ईडीच्या कारवाईसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र भाजपकडून मुद्दाम कारवाया सुरु आहेत. यावर कायदेशीर लढा देण्यास तिन्ही पक्ष सक्षम आहेत. महामंडळाच्या नेमणुकांविषयी बैठकीत चर्चा झाली असून, येत्या १५ दिवसात महामंडळाची नावे जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title : Sharad Pawar | dont take lead will benefit bjp ncp chief sharad pawars instructions ncp ministers

Pune Crime | ‘पप्पी दे’ असे म्हणत घरात घुसून अश्लील कृत्य करत 16 वर्षीय मुलीचा 26 वर्षीय युवकाकडून विनयभंग

5 Money Task | डायरीत नोंद करा 30 सप्टेंबरची तारीख, ‘या’ महिन्यात ‘ही’ सर्व कामे पूर्ण करण्याची आहे डेडलाइन; जाणून घ्या

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

Gold Price Today | किमतीमधील हालचालीने गुंतवणुकदारांमध्ये गोंधळ ! आता ‘या’ कॅरेटचं सोनं 27635 रुपयात 10 ग्रॅम, जाणून घ्या

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update