ED कारवाई बाबत धनंजय मुंडेंसह जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केले ‘हे’ प्रश्‍न ? (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला आहे. अचानकपणे सुरु झालेल्या या कारवाईमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हळू हळू आता याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, आदरणीय पवार साहेबांचा झंझावात पाहून भाजपला घाम फुटलाय. म्हणून साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू झालाय. लक्षात ठेवा,

रात नहीं ख्वाब बदलता है
मंजिल नहीं कारवाँ बदलता है
जज्बा रखो जीतने का क्यूंकि
किस्मत बदले न बदले
पर वक्त जरुर बदलता है

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी सध्या प्रचार सभा गाजवणारे जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा याबाबतचे ट्विट करून सवाल उपस्थित केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,

1) पवार साहेबांना #ed ची अधिकृतपणे नोटीस नाही.
2) चौकशी नाही.
३) चौकशी न करता कारवाई चे आदेश हा कोणता न्याय.

याच उत्तर महाराष्ट्र नक्कीच देईल.

काल संध्याकाळी ही बातमी धडकताच पुण्यासह बारामतीमध्ये त्याचे पडसाद उमटले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंडईतील टिळक पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात येणार आहेत, तर बारामतीत बंद पाळण्याचा स्थानिकांनी निर्णय घेतला आहे.

Visit : policenama.com