आर.आर. पाटलांच्या आठवणीने शरद पवार ‘भावूक’, रोहितच्या रूपाने 5 वर्षात आबा पाहायला मिळतील

सांगली : पोलिसनामा ऑनलाइन – तासगाव येथे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पवारांनी बोलताना आबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. पुढील पाच वर्षात राज्याला रोहितच्या रूपाने आबा पहायला मिळतील असं सूचक विधान यावेळी त्यांनी केलं.

R-R-Patil

आबांच्या आठवणी जाग्या करत पवार म्हणाले, हे आबांचे जाण्याचे वय नव्हते ते माझ्यापेक्षा २० वर्षांनी लहान होते, आबांच्या जाण्याचे दुःख कायम मनात राहील. मात्र पुढील कालावधीत रोहितच्या रूपाने राज्याला पुन्हा आबा पहायला मिळतील असे शरद पवार यावेळी म्हणाले. आबा आणि सामान्य माणसाचं एक वेगळं नातं होतं. त्यांनी एक आदर्श निर्माण करणारे काम केले. त्यांच्या कामाची उंची हिमालयाएवढी न मोजता येणारी आहे असेही पवार यावेळी म्हणाले.

R-R-Patil-Statue

नक्षलवादी भागात मोटारसायकलवरून जाणारे पहिले मंत्री आबा होते, तर आबांनी स्वतः गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मागून घेतलं होतं. अशा प्रकारच्या अनेक आठवणींना पवारांनी यावेळी उजाळा दिला.

R-R-Patil-Statue

२०२४ साली या तासगाव मतदारसंघासाठी पक्ष रोहितला तिकीट देईल इतकी रोहितची मजल आहे. असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच या कार्यक्रमासाठी खासदार अमोल कोल्हे, आमदार सुमन पाटील उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like