Sharad Pawar | ‘ऊसापासून साखर असा विचार करून चालणार नाही आता…’; शरद पवारांचा बळीराजाला ‘हा’ मोलाचा सल्ला !

सांगली : पोलीसनामा ऑफलाइन – Sharad Pawar | भाजप नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांनी राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. त्यांच्या समर्थकांनीही भाजपच्या (BJP) सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. यावेळी बोलताना पवारांनी शेतकऱ्यांना खास सल्ला दिला आहे. ऊसाची शेती (Sugarcane Farming) मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. मात्र मला काळजी वाटते कारण आता मेच्या शेवटपर्यंत कारखाने सुरू राहतील असं दिसत आहे. (Sharad Pawar Advice To Farmers About Sugarcane Farming)

 

आपण पाणी दिसलं की ऊस लावतो पण आता नवीन विचार करावा लागेल. ब्राझील (Brazil), अमेरिका (USA) सारख्या देशात इथेनॉलचा (Ethanol) वापर जास्त करतात, आपल्याला देखील तसा विचार करावा लागेल, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

ऊसापासून फक्त साखर (Sugar) असा विचार करून चालणार नाही, इथेनॉलकडे वळलं पाहिजे. साखरेच्या कर्जाचे व्याज कारखान्यावर येतं, त्यामुळे वेगळं काही करता येतं का, हे पहावं लागेल, असंही शरद पवारांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवरही (Modi Government) निशाणा साधला.

 

दरम्यान, देशाचं राजकारण हे वेगळ्या दिशेने जात आहे. हे राज्य वेगळा विचार करणाऱ्यांच्या हातात आहे.
धर्माच्या नावाने देशात अंधकार पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
देश घडवणाऱ्यांचा आदर करायचा सोडून टीका टिप्पणी केली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रयत्नातून राज्याचा विकास केला जात असल्याचंही पवार म्हणाले.

 

Web Title :- Sharad Pawar | ethanol should be produced from sugarcane only with sugar said sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा